BAR26B14006
बार्शी ः नवीन मराठी शाळेत आयोजित ई-कचरा जनजागृती उपक्रमात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना शिक्षक उमेश नायकुडे.
नवीन मराठी शाळेत ई-कचरा जनजागृती उपक्रम
विद्यार्थ्यांना ई-कचऱ्याचे व्यवस्थापन, पर्यावरण संवर्धनाबाबत मार्गदर्शन
बार्शी शहर, ता. ३० : येथील नवीन मराठी शाळेत केंद्र शासनाच्या ‘ई-कचरा संकलन व जबाबदार विल्हेवाट’ या विशेष मोहिमेंतर्गत ई-कचरा जनजागृती उपक्रम उत्साहात पार पडला. या उपक्रमातून विद्यार्थ्यांना ई-कचऱ्याचे योग्य व्यवस्थापन, पर्यावरण संवर्धन आणि प्रदूषण नियंत्रण याबाबत जागरूक करण्यात आले.
अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक तुकाराम आगवणे होते. यावेळी सहशिक्षक उमेश नायकुडे, कुलदीप काकडे यांनी इयत्ता तिसरी ते सातवीच्या विद्यार्थ्यांना ई-कचऱ्याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले.
मोबाईल, चार्जर, संगणक, की-बोर्ड, वायर तसेच इतर इलेक्ट्रॉनिक उपकरणे वापरण्यायोग्य राहिली नसल्यास त्यातून ई-कचरा निर्माण होतो. हा कचरा सामान्य कचऱ्यात टाकणे किंवा जाळणे पर्यावरणासाठी हानिकारक ठरू शकते. त्यामुळे ई-कचरा वेगळा जमा करणे, इलेक्ट्रॉनिक वस्तू शक्य असल्यास दुरुस्त करून पुन्हा वापरणे आणि जमा केलेला ई-कचरा अधिकृत संकलन केंद्राकडे देणे आवश्यक असल्याचे विद्यार्थ्यांना सांगण्यात आले.
उपक्रमानिमित्त विद्यार्थी आणि शिक्षकांनी पर्यावरण संरक्षणाची प्रतिज्ञा घेतली. ई-कचरा सामान्य कचऱ्यात न टाकणे, इलेक्ट्रॉनिक वस्तूंचा जबाबदारीने वापर करणे, ई-कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावणे आणि कुटुंबीयांसह समाजात याबाबत जनजागृती करणे, असा संकल्प यावेळी करण्यात आला. पर्यावरणाचे रक्षण करणे ही प्रत्येकाची जबाबदारी असून, विद्यार्थ्यांमध्ये लहान वयातच पर्यावरणपूरक सवयी रुजविणे हा या उपक्रमाचा उद्देश होता. आभारप्रदर्शन ज्योती बगले यांनी केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.