Pune Municipal Corporation Sakal
पुणे

Pune News : शहरी गरीब योजनेच्या कार्डसाठी माजी नगरसेविकेची कर्मचाऱ्यांशी खडाजंगी

पुणे महापालिकेच्या शहरी गरीब योजनेत सुधारणा करण्यासाठी कडक नियम केले जात असताना त्याच ज्येष्ठ नागरिकाला त्याचा फटका बसला.

सकाळ वृत्तसेवा

पुणे - महापालिकेच्या शहरी गरीब योजनेत सुधारणा करण्यासाठी कडक नियम केले जात असताना त्याच ज्येष्ठ नागरिकाला त्याचा फटका बसला. वारंवार फेऱ्या मारूनही त्याचे काम होत नसल्याने माजी नगरसेविकेने कर्मचाऱ्यांशी जोरदार खडाजंगी झाली. अखेर सहाय्यक आरोग्य प्रमुखांनी दोन्ही बाजून ऐकून घेत ज्येष्ठाला योजनेचे कार्ड दिल्याने या वादावर पडदा पडला.

महापालिकेच्या शहरी गरीब योजनेचा लाभ घेताना बनावट उत्पन्नाचे प्रमाणपत्र, रेशनकार्ड सादर करून लाभ घेतला जात आहे. त्यामुळे प्रशासनाने गेल्या काही महिन्यापासून या योजनेचे नियम बदलले तसेच प्रक्रिया ऑनलाइन करून यातील फसवेगिरी थांबविण्याचा प्रयत्न केला आहे.

सातारा रस्ता भागातील एक ज्येष्ठ नागरिक शहरी गरीब योजनेचे आधारकार्ड काढण्यासाठी महापालिकेत फेऱ्या मारत होते, पण त्यांना कार्ड मिळत नसल्याने त्यांनी माजी नगरसेविका राणी भोसले यांनी फोन करून तक्रार केली. त्यांनी या विभागातील संबंधित कर्मचाऱ्यांकडे फोन देण्यास सांगितले. हे कर्मचारी फोन घेण्यास तयार नसल्याने नगरसेविका महापालिकेत आल्या.

तळमजल्यावरील कार्यालयाला कुलूप लावून आतमध्ये कर्मचारी बसले होते, त्यांनी ज्येष्ठ नागरिकाच्या वतीने बोलण्याचा प्रयत्न केला असता व्यवस्थित उत्तरे न मिळाल्याने तेथे चांगलाच गोंधळ निर्माण झाला आहे. अखेर हा वाद सहाय्यक आरोग्य प्रमुख डॉ. मनीषा नाईक यांच्यापर्यंत गेला. तेथे राणी भोसले आणि कर्मचाऱ्यांची बाजू ऐकून घेतली. नगरसेविका भोसले यांनाही प्रशासनाची भूमिका सांगून त्यांची समजूत घातली व ज्येष्ठ नागरिकाला कार्ड काढून देऊन हा वाद संपवला.

राणी भोसले म्हणाल्या, ‘जेष्ठ नागरिकास अनेक दिवसापासून कार्ड मिळत नसल्याने महापालिकेत जावे लागले. पण तेथे वाईट अनुभव आल्याने वाद झाला. योजनेत चांगले बदल केले जात असले तरी काही अटी जाचक झाल्या आहेत. त्याचा फटका गरीब ज्येष्ठांना बसत आहे. त्यासाठी सुटसुटीत नियमावली करावी अशी मागणी आयुक्तांकडे केली आहे.

डॉ. मनीषा नाईक म्हणाल्या, ‘शहरी गरीब योजनेचे कार्ड काढण्यासाठी एजंटाकडून त्रास दिला जात असल्याने कार्यालयात कोणालाही जाऊ दिले जात नाही. माजी नगरसेविका यांच्याशी चर्चा करून संबंधित ज्येष्ठ नागरिकास कार्ड काढून दिले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT