Ex-servicemen are required to undergo Cashless Covid test only in ECHS guaranteed hospitals 
पुणे

माजी सैनिकांची 'कॅशलेस' कोविड चाचणी होणार पण, 'या' रुग्णालयांमध्येच

सकाळवृत्तसेवा

पुणे : देशात वाढत असलेल्या कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव लक्षात घेत माजी सैनिक अंशदायी आरोग्य सेवा योजनेअंतर्गत (इसीएचएस) नुकतेच माजी सैनिकांसाठी 'कॅशलेस कोविड 19' चाचणी सुविधा सुरू करण्यात आली होती. या सुविधेसाठी माजी सैनिकांना इसीएचएस तर्फे सुनिश्चित केलेल्या रुग्णालयांमध्येच चाचणी करण्यात येईल. यासाठी काही सरकारी व खाजगी रुग्णालयांना नेमण्यात आले आहे. तसेच आयसीएमआर किंवा प्रशासना मार्फत ठरविण्यात आलेल्या किंमती पैकी जी कमी असेल त्या किंमतीत चाचणी करण्यात येईल. या संदर्भातील परिपत्रक संरक्षण विभागातर्फे नुकतेच काढण्यात आले आहे.

 ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे
 ► क्लिक करा

या परिपत्रकानुसार कॅशलेस कोविड चाचणी योजने अंतर्गत केवळ इसीएचएसने ठरवलेल्या खाजगी व सरकारी रुग्णालयात चाचणी होईल. तसेच शासना मार्फ़त ठरविण्यात आलेल्या किंमतीत चाचणी करण्यात यावी व त्याचे बिल इसीएचएस विभागाला देण्यात यावे. तसेच इसीएचएस धारकांनी आरोग्य सेतू ऍपचा वापर करत व त्यावर आपल्या आरोग्याबाबतची माहिती वेळोवेळी भरायची आहे. तसेच कोविड 19 संबंधित कोणत्याही प्रकारची लक्षणे (ताप, खोकला किंवा श्वसनाचा त्रास) आढळल्यास त्यांनी त्वरित आपल्या जवळच्या इसीएचएसने सुनिश्चित केलेल्या रुग्णालयाशी संपर्क साधून कोविड 19 ची चाचणी करून घ्यावी. तसेच सुनिश्चित करण्यात आलेल्या रुग्णालयांना देखील चाचणी करणे आवश्यक आहे. अशी माहिती इसीएचएस सल्लागार समितीचे सदस्य रवींद्र पाठक यांनी दिली.

राज्यातील सहा जिल्ह्यांत झालेल्या ‘सिरो सर्व्हे’चा निष्कर्ष पहा

तसेच या कॅशलेस कोविड चाचणी सुविधेकरिता पुणे जिल्ह्यातील माजी सैनिकांसाठी सुमारे 25 हून अधिक खाजगी आणि सरकारी रुग्णालयांची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. असे सैनिक कल्याण मंडळाचे जिल्हाध्यक्ष मेजर मिलिंद तुंगार यांनी सांगितले.

मनाचिये वारी : पांडुरंगा, कशासाठी आमच्या पदरी झुरणीची वारी

"शहरातील माजी सैनिकांची संख्या पाहता इसीएचएस मार्फ़त सुनिश्चित करण्यात आलेल्या रुग्णालयांची संख्या चांगली आहे. त्या तुलनेत लष्करी रुग्णालय हे शहरातील ठराविक भागातच आहेत. तसेच सध्या कॅशलेस कोविड चाचणी सुविधा या माजी सैनिकांना देण्यात आल्यामुळे आता त्यांना लष्करी रुग्णालयांसारखाच लाभ होत आहे."
- मेजर मिलिंद तुंगार, सैनिक कल्याण मंडळाचे जिल्हाध्यक्ष

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Snake Discovery: डोळे नसलेल्या सापावर संशोधन; पुण्यातील ‘तस्कर’ सापाची आंतरराष्ट्रीय जर्नलमध्ये नोंद, डोळ्यांच्या जागी गुळगुळीत खवले!

Pune News: प्रवाशांच्या खिशाला बसणार कात्री! तिकिटावरील मर्यादा रद्द; विमान कंपन्यांनी दर वाढवले, काय आहेत कारणे?

Chhatrapati Sambhajinagar: चार किमी आले, उरले ३५ किलोमीटर!; दुसरा टप्पा सुरू; नक्षत्रवाडी येथील जलशुद्धीकरण केंद्रापर्यंत कधी येणार?

Chhatrapati Sambhajinagar: थकबाकीमुळे ८१ हजार ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित

Chhatrapati Sambhajinagar: आठवडाभरात मिळणार शिधापत्रिकेवर केरोसीन; कंपन्यांकडून तालुकानिहाय होणार वाटप

SCROLL FOR NEXT