Corona-Danger 
पुणे

Coronavirus : कोरोना विरोधात लढा देण्यासाठी माजी सैनिक सुद्धा तयार

सकाळवृत्तसेवा

पुणे - देशात वाढत असलेल्या कोरोना रोगाच्या प्रादुर्भावाचा सामना करण्यासाठी सेवानिवृत्त जवानांनी सुद्धा पुढाकार घेतला आहे. राज्य व जिल्हा प्रशासनाला लागणाऱ्या मदतीसाठी संरक्षण मंत्रालयाच्या माजी सैनिक कल्याण विभागाने सेवानिवृत्त जवानांच्या स्वरूपात मनुष्यबळ पुरविण्याचे ठरिवले आहे. यासाठी राज्य सैनिक बोर्ड आणि जिल्हा सैनिक बोर्ड जास्तीत जास्त सेवानिवृत्त स्वयंसेवकांची ओळख पटवून त्यांना या कामासाठी एकत्रित करण्यासाठी महत्वाची भूमिका बजावत आहे. 

सोशल डिस्टनसिंग अंमलात आणणे, काही ठराविक संपर्क क्रमांक शोधणे, विलगीकरण कक्षात लागणाऱ्या सुविधांचा व्यवस्थापनेवर लक्ष केंद्रित करणे, तसेच इतर कोणतेही उपक्रम राबविण्यात मदत करणे अशा प्रकारची जबाबदारी त्यांना देण्यात येत आहे.

या आव्हानात्मक परिस्थितीत देशातील प्रत्येक जिल्ह्यात आणि खेड्यात कार्य करण्यासाठी ते उपलब्ध असून काही राज्यांमध्ये नियंत्रण कक्ष तयार करण्यात आले आहेत. यामध्ये पंजाबमधील 'गार्डियन्स ऑफ गव्हर्नन्स’ या संस्थे अंतर्गत काही माजी सैनिक खेड्यांतील माहिती संकलन करण्यास मदत करीत आहेत. तर छत्तीसगड सरकारने पोलिसांचा मदतीसाठी माजी सैनिकांची नेमणूक केली आहे. उत्तर प्रदेशातील जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी हे जिल्हा नियंत्रण कक्षांच्या संपर्कात आहेत. त्याच बरोबर सेवानिवृत्त लष्करी वैद्यकीय अधिकाऱ्यांना सुद्धा गरज पडल्यास मदत करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

तसेच गरज पडल्यास उत्तराखंड येथील सैनिक विश्रामगृहांना विलगीकरण कक्ष म्हणून वापरले जाऊ शकते. याचबरोबर गोव्यातील स्थानिक प्रशासनाला कोणत्याही मदतीकरिता त्यांची मदत घेतली जाऊ शकते, अशी माहिती संरक्षण विभागाने प्रसिद्धीपत्रका द्वारे दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Point Table: दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाचा Mumbai Indians ला फटका; सर्व सघांची झाली एक लढत, मोठी उलथापालथ

Supreme Court : अनावश्यक खटले टाळा! अधिकाऱ्याच्या बडतर्फीला आव्हान देणाऱ्या केंद्र सरकारला सुप्रीम कोर्टानं फटकारलं, ठोठावला दंड

Pune BJP News: पुणे महापालिका स्वीकृत नगरसेवकांना थेट पाच वर्षांची मुदत; अडीच वर्षांच्या आशेवर पाणी, अनेक कार्यकर्त्यांचा पत्ता कट

Countries with most uranium: अणुऊर्जेसाठी लागणारं युरेनियम कोणत्या देशाकडे सर्वाधिक आहे? भारत, पाकिस्तान कितव्या क्रमांकावर?

Kidney Transplant : मूत्रपिंड प्रत्यारोपणासाठी १९७० रुग्ण प्रतीक्षेत; पुणे विभागातील १४०० पुरुषांसह ५७० महिलांचाही समावेश

SCROLL FOR NEXT