Money Sakal
पुणे

माजी सैनिकांचा विलगीकरणाला येणारा खर्च मिळणार परत

कोरोनाची लागण झाल्यास डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार गृहविलगीकरण केलेल्या माजी सैनिक किंवा त्यांच्या अवलंबितांना उपचारासाठी येणारा खर्च परत मिळणार आहे.

सकाळ वृत्तसेवा

पुणे - कोरोनाची (Corona) लागण झाल्यास डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार गृहविलगीकरण (segregation) केलेल्या माजी सैनिक 9Ex servicemen) किंवा त्यांच्या अवलंबितांना उपचारासाठी (Treatment) येणारा खर्च (Expenditure) परत मिळणार आहे. माजी सैनिक अंशदायी आरोग्य योजनेच्या अंतर्गत (ईसीएचएस) (ECHS) माजी सैनिक व त्यांच्या कुटुंबीयांना याचा लाभ देणार आहे. याबाबतचे परिपत्रक नुकतेच जाहीर केले आहे. (Ex servicemen will get back the cost of segregation)

देशात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने वैद्यकीय सुविधा पुरविण्यासाठी प्रशासनावर ताण येत आहे. कोरोनाचे उपचार वेळेत होणे महत्त्वाचे आहे. अशात अनेकांना गृहविलगीकरण करण्यात येत असून त्यांना घरून उपचारासाठी खासगी रुग्णालयातून ‘गृह विलगीकरण किट’ घ्यावे लागत आहेत. यामध्ये औषधे, डॉक्टरांची तपासणी, परिचारिकांकडून वेळोवेळी पाहणी अशा गोष्टींचा समावेश आहे. ज्या माजी सैनिकांनी किंवा ईसीएचएस लाभार्थ्यांनी खासगी रुग्णालयातून अशा प्रकारचे गृहविलगीकरण किट घेतले आहे, त्यांना दर दिवस एक हजार रुपयांपर्यंत खर्चाचा परतावा मिळणार आहे. यामध्ये केवळ १४ दिवसांचाच खर्च देणार आहे, अशी माहिती ईसीएचएस सल्लागार समितीचे सदस्य रवींद्र पाठक यांनी दिली.

काय करावे लागणार?

या सुविधेचा लाभ घेण्यासाठी ईसीएचएस लाभार्थ्यांना काही कागदपत्रे तसेच खर्चाचे बिल ईसीएचएस विभागाला जमा करावे लागणार. याबाबतच्या अधिक माहितीसाठी लाभार्थ्यांनी echs.gov.in या संकेतस्थळाचा वापर करावा.

अतिरिक्त खर्चही मिळणार

घरी वापरला जाणारा ऑक्सिजन सिलिंडर

त्वरित उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यासाठी रुग्णवाहिका

वैद्यकीय तपासणी व इतर चाचण्या

परतावा मिळण्याच्या या आहेत अटी

गृहविलगीकरणासाठी डॉक्टरांच्या परवानगीचे पत्र व त्याचबरोबर पॉझिटिव्ह आरटीपीसीआर चाचणीचा अहवाल

कोरोनाबाधित असल्याचे एचआरसीटी स्कॅन अहवाल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sion Bridge: मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी! सायन पूल वाहतुकीसाठी खुला होणार; प्रशासनाकडून तारीख आली समोर

Pune News: पुण्यातील उड्डाणपूल कार्यक्रमात प्रशासनाची घोडचूक! चूक दुरुस्त करण्यासाठी उभारलेल्या पुलाचे नावच चुकवलं; प्रकरण काय?

Iran-Israel War: इराणचा मोठा निर्णय! होर्मुज समुद्रधुनी केली खुली, जगभरातलं इंधन संकट टळलं; आता हल्ले करणार नसल्याचं स्पष्टीकरण

Pune Crime: खेळ मांडला! एका महिन्यात विवाहितेचे लावले तीन लग्न; पुण्यातल्या रॅकेटचा पर्दाफाश

Treatment deadline: रुग्णालयात ३० मिनिटांत उपचार सुरू करणे बंधनकारक; नवीन आपत्कालीन नियमावली लागू, प्रशासनाचा कडक इशारा

SCROLL FOR NEXT