पुणे

मास्क घालून एमपीएससीची परीक्षा

सकाळवृत्तसेवा

पुणे  - राज्य लोकसेवा आयोगाच्या वतीने मोटर वाहन निरीक्षक या पदाची पूर्वपरीक्षा रविवारी घेण्यात आली. कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर शहरातील विविध केंद्रांवर आयोजित परीक्षेत उमेदवारांनी मास्क घालून परीक्षा दिली. राज्याच्या विविध भागांतून हजारो विद्यार्थी परीक्षेसाठी पुण्यात आले होते.

परीक्षा केंद्रावर कोरोनासंदर्भात कोणतीही अतिरिक्त सुविधा पुरविण्यात आली नव्हती. खबरदारीचा उपाय म्हणून विद्यार्थ्यांची बायोमेट्रिक हजेरी घेण्यात आली नाही. बाकी परीक्षा नियमित पद्धतीने पार पडली. काही विद्यार्थ्यांनी स्वतः आणलेल्या सॅनिटायझरचा वापर परीक्षेच्या कालावधीत केला. अधिकारी बनण्याचे स्वप्न पाहणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा परीक्षा ही सुवर्ण संधीच असते. त्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव जरी असला, तरी विद्यार्थ्यांनी परीक्षेला जाण्यास टाळाटाळ केली नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Devendra Fadnavis: पुण्याला मिळाले नवीन वैद्यकीय महाविद्यालय! मुख्यमंत्र्यांनी दिली माहिती; पुढच्या शैक्षणिक वर्षापासून प्रवेश सुरु

Vastu Tips: कपाटाच्या वर चुकूनही ठेवू नका 'या' ५ गोष्टी; घरात येऊ शकते गरिबी आणि नकारात्मक ऊर्जा! जाणून घ्या वास्तुनियम...

IPL 2027 Trade: यॉर्करने भल्याभल्यांना गार करणारा गोलंदाजाचं SRH संघात पुनरागमन, पण कोटींचं नुकसान; दिल्ली कॅपिटल्ससोबत मोठी ट्रेड

Mulshi News : दुष्काळग्रस्त असलेल्या तालुक्यांच्या यादीतून मुळशी तालुका वगळला; तालुक्यातील शेतकरी शासनाविरोधात आक्रमक

गोकुळच्या स्टेजवर जुना हिशेब? अमर खोत आणि बाबासाहेब असुर्लेकर यांच्यात वाद

SCROLL FOR NEXT