Excess water storage in Khadakwasla project as compared to last year 
पुणे

खडकवासला प्रकल्पात गतवर्षीच्या तुलनेत जादा पाणीसाठा 

सकाळवृत्तसेवा

पुणे,  : खडकवासला प्रकल्पातील चार धरणांमध्ये मिळून गतवर्षी 28 ऑगस्ट रोजी 28.65 टीएमसी (98.22 टक्के) पाणीसाठा होता. तर, यंदा आजअखेर 28.72 टीएमसी (98.53 टक्के) पाणीसाठा उपलब्ध असून, तो गतवर्षीच्या तुलनेत 0.07 टीएमसीने जास्त आहे. खडकवासला, वरसगाव आणि पानशेत ही तीन धरणे सध्या पूर्ण क्षमतेने भरली आहेत. तर, टेमघर धरणात सध्या 3.28 टीएमसी (88.48 टक्के) पाणीसाठा आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप


खडकवासला धरणातून शुक्रवारी सायंकाळी मुठा नदीपात्रात एक हजार 712 क्‍युसेकने आणि कालव्यातून 1054 क्‍युसेकने विसर्ग सुरु आहे. रात्री दहा वाजल्यापासून खडकवासला धरणातून नऊ हजार 416 क्युसेकने विसर्ग वाढविण्यात येणार आहे.

पानशेत धरणातून 990 क्‍युसेक आणि वरसगाव धरणातून एक हजार 194 क्‍युसेकने विसर्ग सुरू आहे. उजनी धरणात 48.96 टीएमसी (91.40 टक्के) पाणीसाठा झाला आहे. तसेच, भीमा खोऱ्यातील मुळशी, कळमोडी, आंद्रा, भाटघर, नीरा देवघर, वीर, गुंजवणी आणि नाझरे ही धरणे पूर्ण भरली आहेत. तर पिंपळगाव जोगे, माणिकडोह आणि विसापूर या धरणांत 30 ते 45 टक्के इतका पाणीसाठा झाला आहे.

पाणलोट क्षेत्रात तुरळक पाऊस : 
टेमघर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात आज दिवसभरात 6 मिलिमीटर पाऊस झाला. वरसगाव 14 मिमी, पानशेत धरणाच्या पाणलोट क्षेत्रात 13 मिमी पाऊस झाला. 

जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

खडकवासला प्रकल्पातील पाणीसाठा टीएमसीमध्ये, कंसात टक्केवारी : 
टेमघर 3.28   (88.48)
वरसगाव 12.82   (100)
पानशेत 10.65     (100)
खडकवासला 1.97  (100)

इतर धरणांतील पाणीसाठा
भामा-आसखेड 6.49     (85.64)
पवना 7.88     (92.56)
मुळशी 18.46   (100)
भाटघर 23.50     (100)
नीरा देवघर 11.73    (100)
वीर 9.41    (100)
गुंजवणी 3.69   (100)
उजनी 48.96    (91.40)

 

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs NZ: प्रयोग थांबणार अन् न्यूझीलंडविरुद्धच दिसणार भारताची World Cup ची संभावित प्लेइंग-११? कर्णधार शुभमन गिलचे संकेत

France Student Protests : फ्रान्समधील विद्यार्थी आंदोलनाला हिंसक वळण; ४ हजार जणांना अटक, २०० जण जखमी

विद्युत खांबावरील स्पार्किंगमुळे आग; ४ एकर ऊस, सोलार व ठिबकचे साहित्य जळून खाक, शेतकरी उद्ध्वस्त

Irani Cup 2026: रिषभ पंतच्या नेतृत्वातील संघ ठरला चॅम्पियन! फायनलमध्ये रणजी ट्रॉफी विजेत्यांना केलं पराभूत

भाकरीसोबत तोंडाला पाणी आणणारी गोळ्याची आमटी; पाहा खानदेशी पद्धतीची रेसिपी; GOLYACHI AAMTI RECIPE

SCROLL FOR NEXT