पुणे

देशातील पहिले एक्सचेंज ट्रेडेड हवामान डेरिव्हेटिव्ह सुरू

CD

देशातील पहिले एक्स्चेंज ट्रेडेड
हवामान डेरिव्हेटिव्ह सुरू 

मुंबई, ता. २० : ‘एनसीडीईएक्स’ने आज ‘रेनमुंबई’ या देशातील पहिल्या आणि ‘सेबी’ मान्यताप्राप्त एक्स्चेंज ट्रेडेड हवामान डेरिव्हेटिव्ह करारांची घोषणा केली. हा करार यावर्षी एक जूनपासून सुरू होईल. 
यामुळे मोसमी पावसातील अनिश्चितता हे संकट म्हणून न राहता नियमबद्ध आणि वैज्ञानिक चौकटीत मोजता येणारे, व्यवस्थापित करता येणारे आणि व्यापारयोग्य जोखीम म्हणून रूपांतरीत होईल. हा उत्पादन प्रकार आयआयटी मुंबईच्या सहकार्याने विकसित करण्यात आला आहे असून, तो भारतीय हवामान विभागाच्या अधिकृत आकडेवारीवर आधारित आहे.
‘रेनमुंबई’ हे, शेतकरी, बांधकाम कंपन्या, वीजवितरण संस्था, कृषी कर्ज देणाऱ्या बँका, दळणवळण-वाहतूक कंपन्या, आदी घटकांसाठी तयार करण्यात आले आहे. हा फ्युचर करार असून, त्याची टिक साईज एक मिलिमीटर असेल. प्रति मिलिमीटर ५० रुपयांचा लॉट असेल. जास्तीत जास्त पन्नास प्लॉटची ऑर्डर देता येईल. याची सेटलमेंट रोख स्वरूपात होईल. सोमवार ते शुक्रवारी सकाळी दहा ते रात्री साडेअकरा ते ११.५५ पर्यंत याचा व्यवहार करता येईल. महिन्याच्या शेवटच्या कॅलेंडर दिवसाच्या आदल्या कामाच्या दिवशी करार समाप्ती होईल, अशी माहिती ‘एनसीडीईएक्स’चे एमडी व सीईओ डॉक्टर अरुण रास्ते यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Milk Adulteration : दुध भेसळीचे धागेदोरे मंचरपासून सोलापूर, इंदापूरपर्यंत; ‘एफडीए’ ने काढली भेसळखोरांची कुंडली, 'सोनाई डेअरी'ला भेसळयुक्त दूधाचा पुरवठा

Pune News : आम्ही अधिकारी होण्याचे स्वप्न बघायचे नाही का?; महाज्योतीच्या विद्यार्थ्यांचा सवाल, दोन केंद्रावरील परीक्षा रद्द

Latest Marathi News Live Update : “पेपरफुटी थांबलीच पाहिजे!” विद्यार्थी आंदोलनात उतरले सुजात आंबेडकर, मागण्यांना जाहीर पाठिंबा देत सरकारवर ताशेरे

Shendurwada News : रक्तरंजित वाळू, जमिनीच्या व्यवहाराची नशा, अन् विकासकामांतील भ्रष्टाचार मार्गाने पैसा कमावण्याचा नाद सुटेना

MPSC Agitation Suspended : एमपीएससी विद्यार्थ्यांचे टिळक चौकातील आंदोलन स्थगित; उच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर निर्णय

SCROLL FOR NEXT