manchar 
पुणे

मंचर - अवसरी खुर्द सदभावना रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद  

डी.के. वळसे पाटील

मंचर - अवसरी खुर्द (ता. आंबेगाव) येथील शासकीय तंत्रनिकेतन व संशोधन महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी बुधवारी (ता. ५) काढलेल्या सदभावना रॅलीचे नागरिकांनी उत्स्फूर्तपणे स्वागत केले. हम सब एक है, राष्ट्रीय एकात्मतेचा विजय असो. अशा घोषणा यावेळी विद्यार्थ्यांनी दिल्या. 

महाविद्यालयाच्या प्रांगणातून रॅलीचा शुभारंभ प्राचार्य एस. आर. केरकळ यांच्या हस्ते झाला. यावेळी आदर्शगाव गावडेवाडीच्या माजी सरपंच मनीषा गावडे, प्रा. जी.सी. मेनिए, प्रा.ए.आर. उमाळे, प्रा. डॉ. पी.एस. शर्मा, प्रा. डी. एन. रेवडकर, प्रा.डॉ. संजय भंगाळे, प्रा. क्रांतिवीर पवार, प्रा. प्रा. स्वाती संत, प्रा. सचिन डेरे उपस्थित होते. एक हजार २०० विद्यार्थी व विद्यार्थिनी रॅलीत सहभागी झाल्या होत्या. 

अभंगमळा मार्गे अवसरी खुर्द गावात आलेल्या रॅलीचे स्वागत नागरिकांनी केले. बाजारपेठ मार्गे काळभैरवनाथ मंदिरापासून पुन्हा महाविद्यालयाकडे रॅली मार्गस्थ झाली. यावेळी सदभावनेविषयी प्राचार्य केरकळ यांनी मार्गदर्शन केले. ते म्हणाले, “सर्व समाजातील घटकांनी जातीभेद न बाळगता सर्वांनी राष्ट्रीय एकात्मतेला प्राधान्य द्यावे. दोन गटातील भांडण प्रगतीला अडथळा ठरतात. त्यातून वैमनस्य व द्वेषाची भावना निर्माण होते. सामाजिक ऐक्यामुळे विकासाला दिशा मिळते. तरुणांनी समतेचा संदेश सर्वत्र पसरविण्याचे काम करावे. 

यावेळी अॅटो विभागातील प्रा. विवेक पाटील, प्रा. मनोज भोजने यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्याच्या पथकाने सादर केलेल्या ‘सर्व धर्म समभाव’ या सदभावना पथनाट्याला उपस्थितांनी टाळ्या वाजून भरभरून दाद दिली. प्रा. सुजाता वाघमारे यांनी आभार मानले. प्रा.सत्यश्री मांडके यांनी सूत्रसंचालन केले.     

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

वसई किल्ल्यावर शिवरायांच्या पोषाखात फोटो काढताना अडवलं, हिंदी भाषिक सुरक्षा रक्षकाचा मराठीत बोलण्यास नकार; VIDEO VIRAL

AUS vs IND 2nd ODI: विराट कोहली पुन्हा शून्यावर बाद, १७ वर्षांत पहिल्यांदाच 'असं' घडलं; शुभमन गिलही स्वस्तात आऊट

Govardhan Puja: गोवर्धन पूजनासाठी CM योगी गोरखनाथ मंदिरात; गायींना खाऊ घातले गूळ-रोटी, म्हणाले: 'गोवंश भारताच्या समृद्धीचा आधार!'

Ayodhya: थंडीमुळे रामललांच्या दर्शन आणि आरतीच्या वेळेत बदल; ट्रस्टने जाहीर केली नवी वेळ

बातम्या पेरून मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत आलेला, आता घोटाळ्यातून वाचण्यासाठी माझ्याबद्दल खोटं पसरवतोय; धंगेकरांची आणखी एक पोस्ट

SCROLL FOR NEXT