पुणे

'सुधारित विकास आराखडा समिती कार्यान्वित करा'

सकाळवृत्तसेवा

पिंपरी - सुधारित विकास आराखडा समिती कार्यान्वित करा, असा आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पिंपरी- चिंचवड महापालिका आयुक्‍त श्रावण हर्डीकर यांना दिला. जुन्या विकास आराखड्यातील प्रस्तावित रिंगरोड रद्द करावा, या मागणीसाठी स्वाभिमानी घर बचाव संघर्ष चळवळ आणि घर बचाव संघर्ष समितीच्या वतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन त्यांना निवेदन देण्यात आले, त्या वेळी त्यांनी वरील सूचना केल्या. 

या वेळी धनाजी येळकर पाटील, रेखा भोळे, राजेंद्र देवकर विजय पाटील, मनोहर पवार, अमरसिंह आदीयाल, भालचंद्र फुगे आणि शिवाजी इबितदार यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

दिलेल्या आश्‍वासनांची पूर्तता न केल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा कार्यक्रम उधळून लावणार असल्याचा इशारा रिंगरोड बाधितांच्या स्वाभिमानी घर बचाव संघर्ष चळवळीने दिला होता. यापूर्वी मुख्यमंत्री भोसरी येथे एका कार्यक्रमासाठी आले असता रिंगरोड बाधितांनी त्यांचा रस्ता अडविला होता. या पार्श्‍वभूमीवर कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलिसांनी खबरदारी घेतली होती. ‘‘आम्ही मुख्यमंत्र्यांची भेट घडवून आणतो, तुम्ही निवेदन द्या,’’ असे पोलिसांनी दोन्ही संघटनांना सांगितले होते. त्यानुसार पिंपरीतील एका हॉटेलमध्ये ही भेट घडवून आणली.

या वेळी कार्यकर्त्यांनी आपल्या भावना मुख्यमंत्र्यांकडे व्यक्‍त केल्या. ‘जुना विकास आराखडा कालबाह्य झाला आहे, त्यामुळे नवीन आराखडा तयार करण्यासाठी नियुक्‍त केलेली समिती कार्यान्वित करा,’ अशी मागणी केली. त्या वेळी फडणवीस यांनी आयुक्‍त हर्डीकर यांना समिती त्वरित कार्यान्वित करण्याबाबत सूचना केल्या. मुख्यमंत्र्यांनी बाजू ऐकून घेतल्याबाबत रिंगरोडबाधितांनी समाधान व्यक्‍त केले. तसेच, हा प्रश्‍न लवकरच सुटेल, अशी अपेक्षाही व्यक्‍त केली. धनगर समाजाला आरक्षण द्यावे, या मागणीसाठी माजी नगरसेवक राजू दुर्गे, विना सोनवलकर यांनीही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन दिले.

पानसरेंना लवकरच न्याय देऊ
आझम पानसरे यांच्या समर्थकांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. त्या वेळी मुख्यमंत्र्यांनी पानसरे यांना लवकरच न्याय देऊ, असे आश्‍वासन दिले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Will MS Dhoni Play IPL 2027? महेंद्रसिंग धोनी पुढच्या वर्षी पिवळ्या जर्सीत दिसेल का? ऋतुराज गायकवाडचं उत्तर, नेमकं काय म्हणाला?

IPL 2026 Playoff Scenario : चेन्नईचे आव्हान संपुष्टात! गुजरातची Qualifier 1 साठी दावेदारी; आता एका जागेसाठी चार संघांमध्ये स्पर्धा

Abhijeet Dipke: दिल्लीत पोहोचताच पोलीस तिहार जेलमध्ये टाकतील... ‘कॉकरोच जनता पार्टी’चे संस्थापक अभिजीत दीपकेंना भीती सतावतेय

Congress politics : ‘कॉक्रोच जनता पक्ष’ हा असंतोषाचा इशारा; काँग्रेसला नव्याने उभारी देण्याचे हर्षवर्धन सपकाळ यांचे आवाहन

NEET Paper Leak: नीट पेपरफुटी प्रकरणात लातूरचे बालरोगतज्ज्ञ डॉ. मनोज शिरुरे सीबीआय ताब्यात; मुलासाठी प्रश्नपत्रिका खरेदीचा आरोप

SCROLL FOR NEXT