Visually-impaired.jpg 
पुणे

Video : पुण्यात दृष्टीहिन विद्यार्थ्यांनींनी बनवलेल्या वस्तूंचे प्रदर्शन 

विनायक बेदरकर

कोथरूड : पुणे अंध शाळेच्यावतीने 'दिवाळी उत्सव २०१९' या दृष्टीहिन विद्यार्थ्यांनींनी बनवलेल्या वस्तूंचे प्रदर्शन आयोजित केले आले आहे. या प्रदर्शनातील विविध वस्तू बनविण्याची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. या प्रदर्शनाचे उदघाटन सुप्रसिद्ध अभिनेत्री पल्लवी पाटील यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.     

कोथरूडमधील पुणे अंधशाळेतील प्रशिक्षण केंद्रामध्ये दृष्टीहीन विद्यार्थीनी दिवाळी प्रदर्शनाच्या निमित्ताने जोरदार  तयारी करीत आहेत. पणत्या रंगवणे, सुती कापडापासून बॅग तयार करणे. विविध वस्तू तयार करणे. ही त्यांची कामे अंतिम टप्प्यात आली आहेत.

 पुणे अंधशाळेतील दृष्टिहीन विद्यार्थिनींच्या कलाकुसरीतून तयार झालेल्या नाविन्यपूर्ण कलाकृती हे या प्रदर्शनाचे मुख्य आकर्षण आहे. यामध्ये मातीपासून तयार केलेल्या आकर्षक पणत्या, सुती कापडापासून बनवलेले ग्रीटिंग्स, लेडीज बॅग, टॉवेल या वस्तू आहेत.यासोबतच कागदापासून बनवण्यात आलेले ग्रीटिंग्स पाहता येणार आहेत. तसेच लोकरी पासून बनवलेल्या नानाविध रंगाच्या विविध प्रकारच्या टोप्या, लहान मोठ्या आकारातील बटवे, मण्यांपासून बनवलेल्या कलाकृतींचा समावेश आहे. पर्यावरण पूरक लेडीज बॅग, मण्यांच्या माळा आणि कर्णफुले महिलांच्या आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरत आहेत. 

हे प्रदर्शन 18 ते 20 ऑक्टोबर असे तीन दिवस कोथरूड मधील पुणे अंधशाळेमध्ये सकाळी अकरा त रात्री आठ वाजेपर्यंत खुले राहणार आहे. अशी माहिती पुणे अंधशाळेच्या विश्वस्त मृणाल पवार यांनी दिली.



 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

सारखेनंतर आता ताटातली पोळीही महाग; एका महिन्यात गव्हाच्या दरात तब्बल २०० रुपयांची वाढ

Ganesh Chaturthi 2026: आपण गणपती बाप्पा म्हटलं की ‘मोरया’ का म्हणतो? या जयघोषामागे आहे एका गणेशभक्ताची कहाणी

Ahilyanagar Crime: खर्ड्यात तान्हाजी बोराडे खूनप्रकरणाचा दोन दिवसांत छडा; १८ वर्षीय तरुणासह तीन अल्पवयीन ताब्यात

Marathi News Live Updates : तलावातून निघते गणरायाची पालखी; रायगडच्या साले गावातील अनोखी परंपरा

पतीचा मंगळदोष दूर करण्यासाठी पत्नीच्या प्रायव्हेट पार्टला हळदी कुंकू लावून...; भोंदूबाबाकडून अघोरी कृत्य, हुंड्यासाठी छळ

SCROLL FOR NEXT