Land 
पुणे

रेडझोनमुळे रखडला कंपन्यांचा विस्तार

सकाळवृत्तसेवा

पिंपरी - रेडझोनचा प्रश्‍न सुटत नसल्यामुळे तळवडे परिसरातील आयटी कंपन्यांचा विस्तार रखडला आहे. येथील काही कंपन्यांनी विस्तारासाठी परवानगी मागितली होती. मात्र, हा परिसर रेडझोनमध्ये येत असल्यामुळे हा प्रश्‍न मार्गी लागू शकलेला नाही. या विस्तारासाठी संरक्षण विभागाकडून ना हरकत प्रमाणपत्र देण्यात यावे, अशी मागणी करणारे पत्र एमआयडीसीने केंद्र सरकारच्या संरक्षण विभागाच्या सचिवांना दिले होते. मात्र, त्यावर अद्याप कोणतेही उत्तर देण्यात आलेले नाही. 

एमआयडीसीने संरक्षण विभागाला दिलेल्या पत्रामध्ये विस्तार करू इच्छिणारी कंपनी, रेडझोनपासूनचे अंतर, याचा तपशील यामध्ये देण्यात आला आहे. याबरोबरच देहूरोड दारूगोळा कारखान्याच्या स्टेशन कमांडरलादेखील यासंदर्भात सविस्तर पत्र देण्यात आले आहे. मात्र, केंद्र सरकारने रेडझोनच्या प्रश्‍नाबाबत अद्याप निर्णय घेतला नसल्यामुळे आयटी कंपन्यांचा प्रस्तावित विस्तार रखडला आहे. 

आयटी पार्कची परिस्थिती
आंतरराष्ट्रीय पातळीवर काम करणाऱ्या आयटी कंपन्या तळवड्यात कार्यरत आहेत. रेडझोनच्या प्रश्‍नांमुळेच एमआयडीसीने २०१२ पासून तेथे नवीन भूखंड देणे पूर्णपणे बंद केले आहे. ७५ हेक्‍टर जागेत उभ्या असलेल्या या आयटी पार्कमध्ये ६१ भूखंड आहेत. त्यापैकी ३५ भूखंडाचे औद्योगिक कंपन्यांना वाटप केलेले आहे. रेडझोनमुळे १२ भूखंड अद्यापपर्यंत कोणालाही दिले नाहीत. आयटी क्षेत्रातील १७ कंपन्या येथे सुरू आहेत.

तळवडे आयटी पार्क परिसरातल्या आयटी कंपन्यांना विस्तार करायचा आहे. मात्र, रेडझोनच्या प्रश्‍नामुळे तो अनेक दिवसांपासून अडकून पडला आहे. एमआयडीसीने आतापर्यंत सहा वेळा यासंदर्भात केंद्रीय संरक्षण विभागाशी पत्रव्यवहार केला आहे. सध्या येथील परिस्थिती कायम आहे. 
- संतोषकुमार देशमुख, प्रादेशिक अधिकारी, एमआयडीसी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rahul Gandhi Dalit discrimination : देशात अद्यापही दलितांसोबत भेदभाव; चहाच्या टपरीवर दोन प्रकारचे कप : राहुल गांधी

Mumbai Crime: मुंबई-नाशिक महामार्गावर दरोडेखोरांचा थरार, पोलिसाकडूनच ६१ लाखांची लूट, पाच जणांना अटक

Manoj Jarange Maratha Reservation : 'निर्णय झाला नाही तर मुंबईला येणार'; मनोज जरांगे यांचे अंतरवाली सराटीत बारावे आमरण उपोषण सुरू, सरकारला दिला थेट इशारा

Maharashtra Monsoon Prediction : नेपाळच्या पूरस्थितीत अडकलेले संगमनेरचे ४५ पर्यटक सुखरूप भारतात परतले

जीएसटी माफ करण्यासाठी दीड कोटींची मागणी, 40 लाखांची लाच घेताना CGSTचे अतिरिक्त आयुक्त, अधीक्षकासह तिघांना अटक

SCROLL FOR NEXT