पुणे

'एमआरओ'चा विस्तार करण्यासाठी हालचाली सुरु

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : एअर इंडियाच्या मेटेंनन्स रिपेअरिंग अ‍ॅन्ड ओव्हरहॉल (एमआरओ) या देखभाल व दुरुस्ती कंपनीतर्फे एअर इंडियाच्या सर्व विमानांची देखभाल व दुरुस्ती केली जाते. या कंपनीच्या विस्तारासाठी इतर कंपनीच्या विमानांची दुरुस्ती व देखभालीचे कंत्राट मिळण्याबाबत प्रक्रिया सुरु आहे.

स्पाईसजेटच्या विमानांचे कंत्राट तिरुअनंतपुरम येथील एमआरओकडे आहे. मुंबईतील एमआरओच्या माध्यमातून कंपनीला वार्षिक 100 कोटींपेक्षा जास्त महसूल २०१८-१९ या एक वर्षाच्या कालावधीत मिळाला आहे. एअर इंडियाकडे असलेल्या एअरक्राफ्ट रिकव्हरी युनिटच्या माध्यमातून मुंबई विमानतळाच्या धावपट्टीवर अडकलेले स्पाईसजेटचे विमान व शिर्डी विमानतळावर अडकलेले स्पाईसजेटचे विमान हटवणे शक्य झाले होते. काठमांडू विमानतळावर अडकलेले तुर्कीश एअरलाईन्सचे विमान हटवण्याचे काम देखील एअर इंडियाच्या या विभागामार्फत यापूर्वी करण्यात आले आहे. 

एअर इंडिया इंजिनियरींग सर्व्हिसेस लिमिटेड (एआयईएसएल) या कंपनीच्या माध्यमातून 'एअर इंडिया'ला कोट्यवधी रुपयांचा महसूल मिळत आहे, अशी माहिती मुंबई कार्यालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.

भाड्यापोटी वर्षाला मिळतात 100 कोटी

नरिमन पॉइंट येथील एअर इंडियाच्या दिमाखदार 23 मजली इमारतीमधील जागा विविध आस्थापनांना भाडेकराराने देण्यात आल्या आहेत. त्या माध्यमातून कंपनीला वार्षिक 100 कोटी रुपयांचे उत्पन्न मिळत असल्याचे सांगण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime: पुण्यात सैराटपेक्षाची भयानक घटना! प्रेमविवाह केल्याचा मनात राग, तिघांनी सलूनचं सेटर लावलं अन् तरुणावर कोयत्याने वार

Pune News: अमली पदार्थ विरोधी पथकाची माेठी कारवाई! 'कोंढवा, बिबवेवाडीतून २७ लाखांची अफू', मेफेड्रोन जप्त; दोघांना अटक

Dhule News: जोडपं गाढ झोपेत असतानाच नियतीनं डाव साधला, सुखी संसार अर्ध्यावरच संपला; धुळ्यातील दुर्दैवी घटना

DY Chandrachud: माजी CJI चंद्रचूड अजूनही सरकारी बंगल्यातच, सर्वोच्च न्यायालयाचे केंद्र सरकारला पत्र, मोठं कारण आलं समोर

परिवहन मंत्र्यांचे आदेश! 'शालेय विद्यार्थ्यांसाठी एसटीच्या फेऱ्या रद्द करू नयेत'; सव्वापाच लाख प्रवासाचे पास वाटप

SCROLL FOR NEXT