महागड्या औषधांचे दर
कधी कमी होणार?
जयराम रमेश यांचा पंतप्रधानांना प्रश्न
सकाळ न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली, ता. ५ : सामान्य रुग्णांवरील महागड्या औषधांचा भार वाढत असताना, पंतप्रधान नरेंद्र मोदी वेगळीच डफली वाजवण्यात व्यस्त आहेत. रुग्णांना स्वस्त औषधे कधी उपलब्ध होणार, हे मोदी यांनी स्पष्ट केले पाहिजे. त्यांची झोळी उचलण्याची वेळ जवळ येत चालली आहे, अशी टीका काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस जयराम रमेश यांनी सोमवारी सोशल मीडियाच्या माध्यमातून केली.
गंभीर आजारांवरील औषधांच्या किमती भरमसाठ प्रमाणात वाढल्या आहेत. कायदा रुग्णांना दिलासा देण्याचा मार्ग प्रशस्त करत आहे. मग त्यानुसार पुढे वाटचाल करण्यास कोणती अडचण येत आहे, अशी टीका करत रमेश म्हणाले, ‘‘औषधे आणि आरोग्य सेवांच्या नावाखाली रुग्णांकडून मोठ्या प्रमाणात पैशाची वसुली सुरू आहे. ७४ रुपयांचे एक इंजेक्शन ४९८० रुपयांना मिळत आहे. उत्तर प्रदेशात आरोग्य सेवेच्या नावाखाली रुग्णांकडून ६७ पट जास्त वसुली केली जात आहे. कॅन्सरसारख्या प्राणघातक आजाराच्या एका औषधाच्या खुराकावर ५८ हजार रुपये खर्च होतात. यामुळे रुग्णाला उपचारावर वर्षाला दहा लाख रुपयांपर्यंत खर्च करावे लागत आहेत. प्रश्न केवळ एका औषधाच्या किमतीचा नाही तर मागील बारा वर्षांपासून सत्तेत बसलेल्या सरकारच्या धोरणात्मक प्राधान्याचा आहे. पेटंट कायद्यातील ९२ आणि १०० ही कलमे सार्वजनिक हित आणि सरकारी वापरासंदर्भातील आहे. कलम १०० नुसार सरकार पेटंटअंतर्गत येणाऱ्या जीवनरक्षक औषधांची निर्मिती करू शकते किंवा त्याच्या अधिकृत उत्पादनाची व्यवस्था करत गरजू रुग्णांना गैरवाणिज्यिक आधारावर ती उपलब्ध करू शकते. केरळ उच्च न्यायालयाने यासंदर्भात अलीकडेच एक निकाल दिला आहे. कायद्यात तरतूद आहे आणि उच्च न्यायालयाने याबाबतचा मार्ग प्रशस्त केला आहे मात्र तरीही जीवनरक्षक औषधे सर्वसामान्यांच्या आवाक्यापासून बाहेर का आहेत?’’
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.