Crime esakal
पुणे

Pune Crime : महिलेचे शोषण आणि सैन्यात भरतीचे आमिष; तोतया लष्करी अधिकाऱ्याला अटक

भारतीय सैन्य दलात असल्याचे भासवून एका महिलेचे शोषण आणि सैन्यात भरतीचे आमिष दाखवून लाखो रुपयांची फसवणूक करणाऱ्या एका तोतया लष्करी अधिकाऱ्याला पोलिसांनी अटक केली.

सकाळ वृत्तसेवा

पुणे - भारतीय सैन्य दलात असल्याचे भासवून एका महिलेचे शोषण आणि सैन्यात भरतीचे आमिष दाखवून लाखो रुपयांची फसवणूक करणाऱ्या एका तोतया लष्करी अधिकाऱ्याला पोलिसांनी अटक केली. गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथक-२ आणि लष्कराच्या गुप्तचर विभाग सदर्न कमांड, लायझन युनिट यांनी ही संयुक्त कारवाई केली.

प्रमोद भीमराव यादव (वय २७, रा. अमृतवाडी, ता. जत, जि. सांगली) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्याविरुद्ध लष्करी अधिकारी असल्याचे भासवून मुंबइ येक्षील एका ३५ वर्षीय महिलेचे शोषण आणि १६ लाखांची फसवणूक केल्याप्रकरणी कोंढवा पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद आहे. तसेच, त्याने काहीजणांची फसवणूक केल्याची माहिती लष्कराच्या गुप्तचर विभागाकडून गुन्हे शाखेला मिळाली.

त्यानुसार गुन्हे शाखेचे पोलिस उपायुक्त अमोल झेंडे आणि सहायक पोलिस आयुक्त सतीश गोवेकर यांच्या सूचनेनुसार तपास पथक आरोपीच्या मागावर होते. या पथकाने तांत्रिक विश्लेषण करून आरोपीला जत येथून ताब्यात घेतले.

तपासादरम्यान, आरोपी यादव याने फिर्यादी राहुल अशोक बच्चाव (वय २६, रा. श्रीरामनगर, जि. नाशिक) यांच्यासह इतर आठ जणांची फसवणूक केल्याचे समोर आले आहे. लष्करात भरती करण्याचे खोटे आश्वासन देवून त्यांच्याकडून २८ लाख ८८ हजार रुपये घेऊन फसवणूक केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. या प्रकरणी कोंढवा पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.

पोलिस उपायुक्त (गुन्हे) अमोल झेंडे, सहायक आयुक्त सतीश गोवेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक प्रताप मानकर, सहायक निरीक्षक चांगदेव सजगणे, पोलिस उपनिरीक्षक श्रीकांत चव्हाण, मोहनदास जाधव, पोलिस अंमलदार विजय गुरव, विनोद साळुंके, संग्राम शिनगारे, ईश्वर आंधळे, सैदोबा भोजराव, अमोल पिलाने, चेतन शिरोळकर, आर्मी इंटेलिजन्स आणि गुन्हे शाखेच्या तांत्रिक विश्लेषण विभागाने ही कारवाई केली.

लष्करात भरती न झाल्यामुळे तोतया अधिकारी

आरोपी प्रमोद यादव हा माजी सैनिकाचा मुलगा आहे. त्याचे लष्करात भरतीचे स्वप्न पूर्ण झाले नाही. त्यामुळे तो कुटुंबीयांना अंधारात ठेवून लष्करी सेवेत असल्याचे भासवीत होता. तो लष्करी गणवेश परिधान करुन बनावट ओळखपत्र बाळगत असे. त्याने चार महिलांची फसवणूक केल्याची माहिती समोर आल्याचे खंडणी विरोधी पथकाचे पोलिस निरीक्षक प्रताप मानकर यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Live Updates : जातपडताळणी समिती सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार काम करते, त्यात सरकारचा हस्तक्षेप नाही; जरांगेंच्या आरोपावर फडणवीसांनी स्पष्ट सांगितलं

२२ दिवसांपूर्वी उद्घाटन, एक्सप्रेसवे खचला; पॅचवर्क सुकवण्यासाठी लावले १० पंखे, VIDEO VIRAL

Asaram Bapu Bail Rejected : आसाराम बापूंना सुप्रीम कोर्टाचा झटका; अंतरिम जामीन अर्ज फेटाळला, नेमकं कारण काय?

WhatsApp ग्रुप चॅट्समध्ये मोठे बदल; '@all' टॅगसह आले ३ नवीन धमाकेदार फीचर्स!

Nitin Gadkari: घृणास्पद, आक्षेपार्ह आणि अश्लील कंटेंट; गडकरींची बदनामी करणाऱ्या पोस्ट हटवा, हायकोर्टाचे आदेश

SCROLL FOR NEXT