Crime-Scene 
पुणे

गुन्हेगारांच्या जामिनासाठी बनावट कागदपत्रे तयार करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश

सकाळवृत्तसेवा

पुणे - विविध प्रकारच्या गंभीर गुन्ह्यांत गुन्हेगारांना जामीन मिळण्यासाठी बनावट कागदपत्रे तयार करणाऱ्या टोळीच्या मुसक्‍या पुणे पोलिसांनी आवळल्या. या प्रकरणात पोलिसांनी २४ जणांविरुद्ध गुन्हे दाखल करून १३ जणांना अटक केली आहे. 

निलेशकुमार नंदकुमार शहाणे (वय २७, दत्तवाडी), महारुद्र मोहन मंदरे (वय २६, माणिकबाग), असिफ ताहीर शेख (वय २७, कात्रज), मोहसीन बाबू सय्यद (वय ४८, रा. निगडी), रशीद अब्दुल सय्यद (वय ४९, रा. शांतिनगर), अमीर नूरमहम्मद मुलाणी (वय ४४, चिंचवड) अशी एका गुन्ह्यात अटक केलेल्यांची नावे आहेत. तर दुसऱ्या गुन्ह्यात नागेश माणिक बनसोडे (वय ३९, पिंपरी) याला अटक केली आहे. अन्य एका गुन्ह्यात ९ जणांवर गुन्हा दाखल केला असून, अद्याप कोणालाही अटक केली नाही. कोंढव्यात भावेश विजय शिंदे (वय ३३), विक्की विद्यासागर पुडगे (वय २८), कल्पेश सीताराम इंगोले (वय १८), सोनू अशोक जगधने (वय २९), शशांक प्रकाश साळवी (वय ३१), शुभम ज्ञानोबा लांडगे (वय १८) यांना अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात स्वतंत्र चार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

आधार, रेशन कार्डसह सातबाराही
संबंधित टोळीकडून आधार कार्ड, रेशन कार्ड आणि सातबारा उतारे बनावट तयार करीत असत. बहुतांश आरोपी सराईत व घरफोडी, चोऱ्या करणारे होते. जामीन मिळाल्यानंतर ते कधीच न्यायालयात हजर होत नव्हते. आरोपी पोलिसांच्या हाती लागत नसल्यामुळे गुन्हेगारी वाढली होती. या पार्श्‍वभूमीवर पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी दिलेल्या आदेशानुसार पथकांनी कारवाई केली आहे.

Edited By - Prashant Patil

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Surendra Koli : निठारी प्रकरणात निर्दोष मुक्त सुरेंद्र कोलीने जीवन संपवले; २१ वर्षांच्या तुरुंगवासानंतर पुन्हा सुरू केले होते सामान्य आयुष्य

६ वर्षांपासून क्लार्क, पण टायपिंग टेस्टमध्ये तीनदा फेल; जिल्हाधिकाऱ्यांनी डिमोशन करत शिपाई बनवलं

Pune Bus Blaze: शिवाजीनगर चौकात पीएमपी बसला अचानक आग; अग्निशामक जवानाच्या सतर्कतेने प्रवाशांचे प्राण वाचले

Pune Illegal PG Hostels : लोहगावमध्ये ११ बेकायदेशीर पीजी हॉस्टेल सील; विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात घालणाऱ्या जागामालकांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश

Gambling Raid : गंगापूरमध्ये रम्मी जुगार अड्ड्यावर धाड; १.९२ लाखांचा मुद्देमाल जप्त, तिघांसह चौघांवर गुन्हा

SCROLL FOR NEXT