money Sakal
पुणे

पुणे महापालिकेच्या शिष्यवृत्तीचे अर्ज भरण्यास मुदतवाढ

वैद्यकीय प्रवेशाच्या प्रवेश प्रक्रिया सुरू झालेली नसल्याने व अभियांत्रिकी, फार्मसी, कृषी पदवीसह इतर अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रिया लांबणीवर पडल्या आहेत.

सकाळ वृत्तसेवा

वैद्यकीय प्रवेशाच्या प्रवेश प्रक्रिया सुरू झालेली नसल्याने व अभियांत्रिकी, फार्मसी, कृषी पदवीसह इतर अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रिया लांबणीवर पडल्या आहेत.

पुणे - वैद्यकीय प्रवेशाच्या (Medical Admission) प्रवेश प्रक्रिया सुरू झालेली नसल्याने व अभियांत्रिकी, फार्मसी, कृषी पदवीसह इतर अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रिया लांबणीवर पडल्या आहेत. अनेक विद्यार्थ्यांचे (Student) प्रवेश निश्‍चीत झालेले नसल्याने त्यांना शिष्यवृत्तीसाठी (Scholarship) प्रवेशाचा पुरावा जोडणे शक्य नसल्याने हे विद्यार्थी पुणे महापालिकेच्या (Pune Municipal) शिष्यवृत्ती योजनेपासून वंचित राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे या योजनेचे अर्ज भरण्यासाठी २८ जानेवारीपर्यंत मुदत वाढवली आहे. ही मुदत ३१ डिसेंबर रोजी संपणार होती, अशी माहिती अतिरिक्त आयुक्त ज्ञानेश्वर मोळक यांनी दिली.

महापालिकेतर्फे इयत्ता दहावीमधील विद्यार्थ्यांसाठी भारतरत्न मौलाना अबुल कलाम आझाद आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे अर्थसाहाय्य योजनेतंर्गत शिष्यवृत्ती दिली जाते. यामध्ये समाज विकास विभागातर्फे महापालिका हद्दीत राहणाऱ्या विद्यार्थ्यांना दहावीमध्ये ८० टक्के गुण मिळाल्यास १५ हजार व बारावी एवढेच गुण मिळाल्यास २५ हजार रुपायांची शिष्यवृत्ती दिली जाते. महापालिकेच्या शाळांमधील व मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी ही अट ६५ टक्क्यांची आहे.

कोरोनामुळे यंदा पदवीच्या प्रवेश प्रक्रिया लांबली आहे. आरक्षणाच्या मुद्द्यावरून वैद्यकीय पदवी प्रवेशाची नीटचे प्रवेश अजून सुरूच झाले नाहीत. त्यामुळे अनेक हुशार विद्यार्थ्यांना महापालिकेच्या योजनेसाठी अर्ज भरता आलेला नाही, त्यामुळे आता २८ जानेवारीपर्यंतची मुदतवाढ दिली आहे. आतापर्यंत या योजनेसाठी ११ हजार ०९१ अर्ज आले आहेत. शिष्यवृत्तीसाठी पालिकेच्या अंदाजपत्रकात २१ कोटीची आहे, अशी माहिती मोळक यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

नागपूर पदवीधर निवडणूक; दुसऱ्या पसंतीच्या मतांमध्ये वंजारींची मुसंडी; महायुतीच्या कोहळेंचे मताधिक्य केले सर; निकालाकडे राज्याचं सर्वांचे लक्ष

Mumbai Night Cab Viral Video : "आज मला पुरुष असल्यासारखं वाटलं!"; पहाटे २ वाजता मुंबईत उतरलेल्या तरुणीने 'त्या' कॅबमधून प्रवास केला अन्... व्हिडिओ तुफान व्हायरल!

Mumbai News : वाराणशीतून महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्तांसाठी मदतीचा हात; काशी महाराष्ट्र सेवा समितीचा पुढाकार

WPL 2027 Auction : सोफी मॉलिनेक्स ठरली महागडी खेळाडू... मुंबई इंडियन्स, RCB चे तगडे संघ तयार; जाणून घ्या सर्व संघांची लिस्ट...

Marathi News Live Updates : वाचा दिवसभरातील महत्वाच्या घडामोडी

SCROLL FOR NEXT