Extension for voter registration of Savitribai Phule Pune University till July 24 pune Sakal
पुणे

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या मतदार नावनोंदणीसाठी २४ जुलैपर्यंत मुदतवाढ

पदवीधर, शिक्षक आणि संस्था प्रतिनिधींना नोंदणी करण्याचे आवाहन

मीनाक्षी गुरव @GMinakshi_Sakal

पुणे : सार्वजनिक विद्यापीठ कायद्यांतर्गत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात २०२२ या वर्षात होणाऱ्या विविध अधिकार मंडळाच्या निवडणुकीसाठी मतदार यादीत नाव नोंदणीसाठी विद्यापीठ अधिकार मंडळाने मुदतवाढ दिली आहे. याआधी प्राचार्य, शिक्षक व विभागप्रमुख यांना १३ जुलैपर्यंत मुदत होती ती वाढवून २३ जुलै करण्यात आली आहे. तर पदवीधरांना व संस्था प्रतिनिधींनीना १४ जुलैपर्यंत मुदत देण्यात आली होती ती वाढवून आता २४ जुलै करण्यात आली आहे.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या विविध प्राधिकरणाची निवडणूक प्रक्रिया जून २०२२ पासून सुरू झाली आहे. या प्राधिकरणाची मुदत पुढील पाच वर्षांसाठी असणार आहे. मतदारांच्या नोंदणीसाठी विद्यापीठाने election.unipune.ac.in हे वेब पोर्टल तयार केले आहे. या माध्यमातून पदवीधर घरबसल्या आपली नोंदणी करू शकतात. जुन्या मतदारांनाही पुन्हा नोंदणी करणे आवश्यक असते. ज्यांनी अद्याप नोंदणी केलेली नाही त्यांनी लवकरात लवकर नोंदणी करावी यासाठी पुन्हा मुदतवाढ दिली जाणार नाही असे विद्यापीठ प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

नावनोंदणीसाठी लिंक

https://election.unipune.ac.in/EleApp/Registration/Rg_Registration2017.aspx

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Racism in Australia : भारतीयांना मारुन टाका अन् त्यांच्या बायका गुलामगिरीसाठी विका... ऑस्ट्रेलियात वर्णद्वेषाचा धक्कादायक व्हिडिओ व्हायरल

College Student Death : वाढदिवसाच्या 3 दिवस आधीच काळाचा घाला! कोल्हापुरात 18 वर्षांच्या महाविद्यालयीन तरुणीनं उचललं टोकाचं पाऊल; घरात कोणी नसताना संपवलं जीवन

Hingoli: हिंगोली जिल्ह्यात पुन्हा भूकंपाचा सौम्य धक्का; वसईजवळ ३.५ तीव्रतेची नोंद, जीवित-वित्तहानी टळली..

Latest Marathi News Live Update : हिंगोलीत पुन्हा भूकंप, 3.5 रिश्टर्स स्केअर भूकंप झाल्याची भूमापक केंद्रावर नोंद

...अन् अचानक सेटवर आले रोहित शेट्टी! 'Governor' च्या शूटिंग दरम्यान चिन्मय मांडलेकरसोबत घडला रंजक प्रसंग

SCROLL FOR NEXT