Extension of Medical Board Date for candidates who passed written examination of NDA pune
Extension of Medical Board Date for candidates who passed written examination of NDA pune google
पुणे

एनडीएची लेखी परीक्षा उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना वैद्यकीय मंडळाच्या तारखेची मुदत वाढ

सकाळ वृत्तसेवा

पुणे : लष्कराच्या तिन्ही दलांचे अधिकारी प्रशिक्षण देणारी खडकवासला येथील राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या (एनडीए) १४८ व्या तुकडीच्या प्रवेश प्रक्रिया अंतर्गत सैन्यदलाद्वारे काही सूचना जाहीर करण्यात आल्या आहेत. यामध्ये करण्याची सवलत देण्यात आली आहे. एनडीएची लेखी परीक्षा उत्तीर्ण केल्यानंतर सर्व्हिस सिलेक्शन बोर्डाच्या मुलाखती (एसएसबी) आणि वैद्यकीय तपासणीची प्रक्रिया पार पडते. परंतु यंदा सीबीएसई बोर्डाच्या १२ वीच्या परीक्षा उशिरा झाल्या.

त्यामुळे काही उमेदवारांची इयत्ता १२ वी ची परीक्षा आणि एएमबीच्या प्रक्रियेची तारीख एकाच वेळी असल्याने त्‍यांना या प्रक्रियेत सहभाग घेण्यात अडचणी येत होत्या. त्यामुळे अशा उमेदवारांना आपली एएमबीची प्रक्रिया येत्या गुरुवारपर्यंत (ता. ३०) पूर्ण करणे आवश्‍यक आहे. तसेच यानंतर कोणत्याही प्रकारे तारखांची मुदत वाढ करण्याची प्रक्रिया केली जाणार नसल्‍याच्या सूचना देण्यात आल्‍या आहेत. याबाबतच्‍या अधिक माहितीसाठी उमेदवारांनी www.joinindianarmy.nic.in या अधिकृत संकेतस्थळाचा वापर करावा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vijay Wadettiwar : ''हेमंत करकरेंची हत्या पोलिसांकडून'', विजय वडेट्टीवारांचा आरोप अन् फडणवीसांचा पलटवार

IPL 2024 LSG vs KKR Live Score: रिंकू सिंग 16 धावांवर बाद, कोलकाताचा अर्धा संघ परतला पॅव्हेलियनमध्ये

Sharad Pawar : आपण सर्वजण एक आहोत तोपर्यंत कोणी धक्का लावू शकत नाही : शरद पवार

Prakash Ambedkar : पवार व ठाकरे यांची मागच्या दरवाजातून भाजपशी चर्चा; ॲड. प्रकाश आंबेडकर यांचा दावा

Lok Sabha Election 2024 : लोकसभेचा तिसऱ्या टप्प्यातील प्रचार संपला, देशभरातील 94 जागांसाठी 7 मे रोजी मतदान

SCROLL FOR NEXT