Exam 
पुणे

दहावी-बारावीसाठी अर्ज करणाऱ्यांना मुदतवाढ

सकाळवृत्तसेवा

पुणे - महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे २०२१ मध्ये घेण्यात येणाऱ्या दहावी-बारावीच्या परीक्षेसाठी नाव नोंदणी प्रमाणपत्र मिळालेल्या खासगी विद्यार्थ्यांना नियमित शुल्कासह अर्ज (आवेदनपत्रे) भरण्यासाठी २८ फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. दहावी-बारावीची परीक्षा खासगीरीत्या देणाऱ्या विद्यार्थ्यांना नाव नोंदणी प्रमाणपत्रे २५ जानेवारीपासून त्यांच्या भ्रमणध्वनीवर आणि ईमेलवर उपलब्ध करून देण्यास सुरुवात झाली आहे. या विद्यार्थ्यांना आपले स्वत:चे नावनोंदणी प्रमाणपत्र http://form17.mh-hsc.ac.in आणि http://form17.mh-hsc.ac.in या  संकेतस्थळावर उपलब्ध होत आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

या विद्यार्थ्यांना यापूर्वी नियमित शुल्काने १३ फेब्रुवारीपर्यंत अर्ज करण्याबाबत कळविले होते. मात्र, याला पुन्हा मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यामुळे आता २०२१ मध्ये होणाऱ्या दहावी-बारावीच्या बोर्डाच्या परीक्षेसाठी खासगीरीत्या नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांना नियमित शुल्कासह २८ फेब्रुवारीपर्यंत, तर विलंब शुल्कासह १ ते ७ मार्च दरमान्य अर्ज करता येणार आहे.

नियमित व विलंब शुल्काच्या आवेदनपत्राची मूळ प्रत शुल्कासह त्वरित विभागीय मंडळाकडे सादर करण्यासाठी माध्यमिक शाळेतील मुख्याध्यापक, कनिष्ठ महाविद्यालयातील प्राचार्य यांनी विभागीय मंडळाकडे जमा करावीत, असेही राज्य मंडळाचे सचिव डॉ. अशोक भोसले यांनी स्पष्ट केले आहे. तसेच याबाबत अधिक माहितीसाठी https://www.mahahsscboard.in/ या संकेतस्थळाला भेट द्यावी, असे आवाहन राज्य मंडळाने केले आहे.

Edited By - Prashant Patil

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asian Games: नीरज नव्हता, पण तरी यशवीर-रोहितने भालाफेकीत जिंकली मेडल्स; गुलवीरलाही ऐतिहासिक रौप्य

Maharashtra Rain Forecast : राज्यात पावसाचा जोर वाढणार? हवामान विभागाकडून पुढील 5 दिवसांसाठी मोठे भाकीत; कोकण, मध्य महाराष्ट्रसह घाटमाथ्यावर बरसणार पाऊस

Ujjain Shahi Masjid: मुस्लीम पक्षाची याचिका फेटाळली! उज्जैनची शाही मशीद पाडण्यास स्थगिती देण्यासाठी उच्च न्यायालयाचा नकार

Latest Marathi News Live Update: शेतातील सुपीक मातीची चोरी, तक्रार दाखल

‘राइज अँड फॉल 2’मध्ये मोठा राडा! शहजाद पूनावालांशी सिवेत तोमरचं जोरदार भांडण; धक्का दिला, कपडेही फाडले, धक्कादायक व्हिडिओ समोर

SCROLL FOR NEXT