Aadhar-Card
Aadhar-Card 
पुणे

आधार नोंदणी करण्यासाठी पहिली ते बारावीमधील विद्यार्थ्यांना मुदतवाढ

सकाळवृत्तसेवा

पुणे - एकच आधार कार्ड आणि दोन वेगळ्या विद्यार्थ्यांची नावे, अस्तित्वात नसलेले आधार क्रमांक नोंदणी झाल्याचे लक्षात आले आहे. त्यामुळे आता शालेय शिक्षण विभागाने इयत्ता पहिली ते बारावीमधील विद्यार्थ्यांच्या आधार नोंदणी आणि अद्यायावत करण्यासाठी ३१ मार्चपर्यंत मुदत दिली आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

विद्यार्थ्यांसाठी असणाऱ्या विविध योजनांचा लाभ त्यांना घेता यावा, याकरिता सरल प्रणालीमध्ये विद्यार्थ्यांच्या आधार क्रमांकाची नोंदणी करणे आवश्यक असते. या शैक्षणिक वर्षात (२०२०-२१) वयाची पाच अथवा पंधरा वर्ष होणाऱ्या विद्यार्थ्यांच्या हाताच्या अंगठयाचा ठसा आधार नोंदणीमध्ये बायोमॅट्रिक अपडेटद्वारे अद्ययावत करणे आवश्यक आहे. मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शाळा सुरू होईपर्यंत आधार नोंदणीसाठी राज्यात उपलब्ध असलेल्या तहासिल कार्यालय, बँक आणि टपाल कार्यालय अशा पर्यायी व्यवस्थांचा वापर करून पहिली ते बारावीच्या विद्यार्थ्यांची आधार नोंदणी आणि अद्यायवतीकरणाचे काम ३१ मार्चपर्यंत शाळा व्यवस्थापनाने करावे, असा आदेश शालेय शिक्षण विभागाने परिपत्रकाद्वारे दिला आहे.

शाळांनी आधार नोंदणी करताना ही काळजी घ्यावी -
- आधार नोंदणी करताना गर्दी होणार नाही, सुरक्षित अंतर ठेवून किंवा ५० पेक्षा जास्त विद्यार्थी उपस्थित राहणार नाहीत, असे नियोजम करावे.
- खासगी अनुदानित, अंशत: अनुदानित आणि विना अनुदानित शाळा यातील पटसंख्या जास्त असलेल्या शाळांना प्राधान्य द्यावे.
- एकूण ८१६ आधार नोंदणी संच महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेमार्फत गटसाधन केंद्रावर उपलब्ध करून दिले आहेत.
- आधार नोंदणी आणि अद्यायवतीकरणासाठी संबंधित तहसीलदार आणि प्रशासकीय यंत्रणांशी समन्वय साधावा.

- राज्यातील शाळांची संख्या : १, १०, ३१५
- विद्यार्थी संख्या : २, २५, ६०,५७८
-विद्यार्थ्यांसाठी योजना : शालेय पोषण आहार योजना, मोफत गणवेश योजना, मोफत पाठ्यपुस्तक योजना आदी
- सरल प्रणालीत आधार नोंदणी प्रलंबित असलेल्या विद्यार्थ्यांची संख्या : ६४, ५९, ३८८

Edited By - Prashant Patil

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dombivli MIDC Blast Update: डोंबिवली अपघातस्थळी आणखी 3 मृतदेह सापडले, एकूण मृतांचा आकडा 11 वर

Share Market Today: शेअर बाजारातील विक्रमी वाढ कायम राहणार का? काय आहे तज्ज्ञांचा अंदाज

Rahul Gandhi : भाजपच्या दृष्टीने महिला दुय्यम;दिल्लीतील सभेत राहुल गांधींचे टीकास्त्र

Latest Marathi News Live Update: अंबादास दानवे डोंबिवली स्फोट दुर्घटनास्थळी

Malaysia Masters : दुसऱ्या फेरीत कोरियाच्या यू जिनविरुद्ध तीन गेममध्ये सिंधूचा संघर्ष

SCROLL FOR NEXT