Extension to apply for JEE Main Exam pune  sakal
पुणे

'जेईई' मेन परीक्षेचा अर्ज करण्यासाठी मुदतवाढ

देश पातळीवर अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी होणारी ‘जेईई मेन’ ही सगळ्यात मोठी परीक्षा

- मीनाक्षी गुरव

पुणे : देशातील आयआयटी, एनआयटी आणि नामांकित अभियांत्रिकी व तंत्रज्ञान शिक्षण संस्थांमधील प्रवेशासाठी अनिवार्य असलेल्या जेईई मेन परीक्षेचा अर्ज भरण्यासाठी आता मुदतवाढ देण्यात आली आहे. एप्रिल-मे महिन्यात होणाऱ्या या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना येत्या मंगळवारपर्यंत (ता.५) अर्ज करता येणार आहे. देश पातळीवर अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी होणारी ‘जेईई मेन’ ही सगळ्यात मोठी परीक्षा आहे. दरवर्षी साधारणत: नऊ ते दहा लाख विद्यार्थी या प्रवेश परीक्षेसाठी अर्ज करतात. नॅशनल टेस्टिंग एजन्सीमार्फत (एनटीए) देशभरात जेईई मेन परीक्षेचे आयोजन करण्यात येते.

सध्या देशातील विविध राज्य शिक्षण मंडळे आणि अन्य मंडळांची बारावीची परीक्षा सुरू आहे. बोर्डाची बारावीची परीक्षा आणि जेईई मेन परीक्षा साधारणत: एकाच कालावधीत येत असल्याचे ‘एनटीए’च्या निदर्शनास आले. या पार्श्‍वभूमीवर ‘एनटीए’ने मार्चमध्ये परीक्षेच्या वेळापत्रकात बदल केला आहे. त्याप्रमाणे आता ही परीक्षा एप्रिल आणि मे २०२२ या कालावधीत होणार आहे. या प्रवेश परीक्षेसाठी नोंदणी करण्यासाठी ‘एनटीए’ने मुदत वाढविली आहे.आतापर्यंत परीक्षेसाठी अर्ज करता न आलेल्या विद्यार्थ्यांना आता मंगळवारपर्यंत अर्ज करता येणार आहे. अर्ज करण्यासाठी मुदत वाढवून दिल्याने आता विद्यार्थ्यांना दिलेल्या मुदतीत परीक्षेचा अर्ज करावा लागणार आहे. यानंतर विद्यार्थ्यांना अर्जासाठी दुसरी संधी दिली जाणार नाही.

जेईई मेन परीक्षेसाठी ऑनलाइन अर्ज करताना विद्यार्थ्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागले होते. त्यामुळे विद्यार्थ्यांना वेळेत अर्ज करता आले नाही. या पार्श्वभूमीवर अर्ज करण्यासाठी मुदतवाढ देण्यात यावी, अशी मागणी विद्यार्थ्यांकडून होत होती. त्याची दखल घेत ‘एनटीए’ने ही मुदतवाढ जाहीर केली आहे. प्रवेश परीक्षेसाठी एकदा अर्ज भरला आणि तो अर्ज सबमिट झाल्यास, त्यानंतर अर्जात कोणत्याही प्रकारे दुरुस्ती करण्याची मुभा विद्यार्थ्यांना मिळणार नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठीचा अर्ज काळजीपूर्वक भरावा, असे ‘एनटीए’तर्फे स्पष्ट करण्यात आले आहे.

जेईई मेन परीक्षेचा कालावधी

- २१, २४,२५,२९ एप्रिल

- १ आणि ४ मे

जेईई मेन परीक्षेबाबत अधिक माहितीसाठी

www.nta.ac.in

https://jeemain.nta.nic.in/

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tejashwi Yadav FIR : मोठी बातमी! तेजस्वी यादव यांच्याविरोधात गडचिरोलीत गुन्हा दाखल

TikTok India News: भारतात पुन्हा 'टिकटॉक' सुरू होणार? ; वेबसाइट सुरू झाल्याचे समोर आल्याने चर्चांना उधाण!

Ajit Pawar: 'चाकरमानी’ नव्हे; ‘कोकणवासीय’ म्हणायचे! अजित पवारांची जागवला स्वाभिमान; शासन लवकरच परिपत्रक काढणार

Manoj Jarange Patil: मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मंत्रिमंडळ उपसमितीचं पुनर्गठन; राधाकृष्ण विखेंकडे अध्यक्षपद

Georai News : पाझर तलावात उतरल्याने बुडून शेतमजूराचा मृत्यू; दिवसभर शोध घेऊनही मृतदेह मिळाला नाही

SCROLL FOR NEXT