Cyber Crime esakal
पुणे

Cyber Crime : पोलिस असल्याचे सांगून ज्येष्ठाला २१ लाखांना लुबाडले

पोलिस असल्याची बतावणी करून ज्येष्ठ नागरिकाची सुमारे २१ रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला.

सकाळ वृत्तसेवा

पुणे - पोलिस असल्याची बतावणी करून ज्येष्ठ नागरिकाची सुमारे २१ रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. वानवडी परिसरात १५ ते २८ जुलै या कालावधीत हा प्रकार घडला.

या प्रकरणी साळुंके विहार येथील एका ७७ वर्षीय ज्येष्ठ नागरिकाने वानवडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून सायबर चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी ज्येष्ठ व्यक्ती वानवडी परिसरातील साळुंके विहार रस्त्यावरील एका उच्चभ्रू सोसायटीमध्ये राहतात.

त्यांना १५ जुलै रोजी सायबर चोरट्यांनी मराठे आणि विजय खन्ना या नावाने मोबाईलवर संपर्क साधला. त्यांना पोलिस असल्याची बतावणी करून ‘तुम्ही गैरकृत्य केले असल्याचे सांगत कारवाई करू,’ अशी धमकी दिली. कारवाई न करण्यासाठी त्या ज्येष्ठ नागरिकास बंगळूर येथील एका बॅंक खात्यात ऑनलाइन पैसे भरण्यास सांगितले.

त्यावर या ज्येष्ठ नागरिकाने भीतीपोटी सायबर चोरट्यांच्या बॅंक खात्यात वेळोवेळी २० लाख ८० हजार रुपये जमा केले. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी सायबर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. सायबर पोलिसांनी गुन्हा दाखल करून तो वानवडी पोलिस ठाण्यात वर्ग केला आहे. पुढील तपास वरिष्ठ पोलिस निरीक्षक संजय पतंगे करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

VIDEO : शाळेच्या वेळेत मुख्याध्यापिका झोपेत, मद्यधुंद पतीची खुर्चीत बसून अरेरावी, संतप्त पालकांनी थेट शाळेला ठोकले कुलूप

Commonwealth Games 2026: राष्ट्रकुल स्पर्धेसाठी भारताचे १२५ खेळाडू सज्ज; जाणून घ्या खेळाडूंची यादी अन् Live Streaming Chanel

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्रीचं बॉलिवूडमध्ये पदार्पण; 'या' चित्रपटातून करणार नवी इनिंग

Latest Marathi News Live Update : नागपुरात ठाकरेंच्या शिवसेनेचं रामरक्षा आंदोलन, उद्धव ठाकरे राममंदिराच्या दिशेनं रवाना

देवेंद्र फडणवीस हेच महाराष्ट्राचे राम! जैन मुनी निलेशचंद्र यांच्याकडून कौतुक; उद्धव ठाकरेंवर केली टीका, काय म्हणाले?

SCROLL FOR NEXT