crime news sakal
पुणे

माथाडी संघटनेच्या नावाखाली दोन लाख 90 हजार रुपयांची खंडणी उकळणारा अटकेत

माथाडी संघटनेच्या नावाखाली दोन लाख ९० हजार रुपयांची खंडणी उकळणाऱ्या एकास खंडणी विरोधी पथकाने अटक केली.

सकाळ वृत्तसेवा

माथाडी संघटनेच्या नावाखाली दोन लाख ९० हजार रुपयांची खंडणी उकळणाऱ्या एकास खंडणी विरोधी पथकाने अटक केली.

पुणे - माथाडी संघटनेच्या नावाखाली दोन लाख ९० हजार रुपयांची खंडणी उकळणाऱ्या एकास खंडणी विरोधी पथकाने अटक केली. खडकी रेल्वे स्थानकातील मालधक्का परिसरात ही कारवाई करण्यात आली.

पप्पू भिवा खरात (वय ३६, रा. ओैंध) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी चाकण येथील एका खासगी कंपनीतील अधिकाऱ्याने फिर्याद दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे एका खासगी कंपनीत अधिकारी आहेत. त्यांच्या कंपनीसाठी अन्य राज्यांतून रेल्वेने माल पुण्यात येतो. खडकीतील मालधक्का परिसरात रेल्वेने आलेल्या माल उतरल्यानंतर तो कंपनीमार्फत त्यांच्या कंपनीमध्ये पोहोच केला जातो.

दरम्यान, खरात याने माथाडी संघटनेच्या नावाखाली कंपनीतील अधिकाऱ्याला धमकावले. "मालाची वाहतूक आमच्या संघटनेकडून करण्यात येईल, " असे सांगून खरातने त्यांच्याकडून एक लाख ९० हजार रुपये खंडणी उकळली. त्यानंतर खरातने पुन्हा कामात अडथळा आणून एक लाख रुपयांची मागणी केली. पैसे न दिल्यास जातीवाचक शिवीगाळ केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची धमकी त्यांना देण्यात आली. खरातला एक लाख रुपये त्यांनी दिली. पैसे दिल्यानंतर खरातकडून धमकी दिल जात होती. याबाबत अधिकाऱ्याने पोलिसांकडे तक्रार दिली होती. त्यानुसार, पोलिसांनी खरातला सापळा लावून अटक केली. त्यानंतर त्याच्या विरुद्ध खडकी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणाचा तपास पोलिस उपनिरीक्षक अर्जुन बोमदंडी करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

UPSC Fake Rank Case : युपीएससी उत्तीर्ण तरुणाचा आमदार अन् पोलिसांनी केला सत्कार; सत्य समजताच सर्वांच्या पायाखालची जमीनच सरकली

Indian Women Hockey: पात्रता मिळवली, आता लक्ष्य विजेतेपदाचे; भारतीय महिला हॉकी संघाचा आज इटलीविरुद्ध उपांत्य सामना

Viral Video: व्हायरल होण्यासाठी वादग्रस्त कृत्य! चेंबूरमध्ये आगरी-कोळी परंपरेचा अपमान, व्हिडिओनंतर उसळला संताप

'मी तिला किस करणार नाही' संजय दत्तने 'या' अभिनेत्रीसोबत किसिंग सीन करण्यास दिलेला नकार, म्हणालेला...'तिला मी...'

Kolhapur Auto Rickshaw Drivers Protest : 42 रुपयांचा एलपीजी गॅस 80 रुपये कसा झाला? दरवाढीवरून रिक्षाचालकांचा एलपीजी गॅस पंपाला घेराव

SCROLL FOR NEXT