पुणे

अनैतिक संबंधातून खून, पुणे पोलिसांनी स्लीपर्सवरुन शोधून काढले मारेकरी

रात्री तो तरुण विवाहित महिलेला भेटण्यासाठी आला, त्यावेळी....

दीनानाथ परब

पुणे: ऑक्टोबरच्या मध्यावर पुण्याच्या बावधनमध्ये (Pune Bavdhan) अनैतिक संबंधांमधुन (extra marital affair) एका २७ वर्षीय तरुणाची हत्या झाली होती. २२ ऑक्टोबरला तरुणाच्या आईने मुलगा बेपत्ता असल्याची पोलिसात तक्रार नोंदवली होती. या प्रकरणात मारेकऱ्यांना शोधून काढणं पोलिसांसमोर एक मोठ आव्हान होतं. अखेर चणाक्ष पुणे पोलिसांनी (Pune Police) स्लीपर्सवरुन (slipper) मारेकऱ्यांना शोधून काढलं. या प्रकरणात मुख्य आरोपीसह तिघांना अटक करण्यात आली आहे.

पोलिसांनी कसं शोधून काढलं?

मृत तरुणाच्या पायातील स्लीपर्स पोलिसांना एका घराच्या अंगणात दिसली. त्यावरुन पोलीस मुख्य संशयितापर्यंत पोहोचले. बावधन येथे राहणारा हा तरुण २२ ऑक्टोबरला बेपत्ता असल्याची तक्रार नोंदवण्यात आली होती. तपास चालू केल्यानंतर पुणे पोलिसांनी अपहरणासह वेगवेगळ्या शक्यता तपासल्या. एक दिवस पोलिसांना बेपत्ता असलेल्या तरुणाच्या पायातील स्लीपर्स एक घरासमोरच्या अंगणात दिसल्या.

ज्या माणसाच्या अंगणात स्लीपर सापडल्या, त्याच्या पत्नीसोबत बेपत्ता तरुणाचे प्रेमसंबंध होते. २१ ऑक्टोबरच्या रात्री मुख्य आरोपीने पत्नीच्या मोबाइलवर तरुणाचे दोन मिस कॉल्स पाहिले. तरुणाने त्याच्या मोबाइलवरुन हे फोन कॉल्स केले होते. त्यानंतर त्याने तरुणाला संपवण्याचा निर्णय घेतला. इंडिया टुडेने हे वृत्त दिले आहे.

रात्री तो तरुण आरोपीच्या पत्नीला भेटण्यासाठी आला. त्यावेळी आरोपी आणि त्याच्या दोन साथीदारांनी तरुणावर तीक्ष्ण हत्याराने वार केले. त्यानंतर तिन्ही आरोपींनी तरुणाचा मृतदेह निर्जन स्थळी नेऊन जाळला. पोलिसांनी एका आरोपीला पुण्यातून अटक केली. मुख्य आरोपी आणि त्याच्या साथीदाराला मध्य प्रदेशातून अटक करण्यात आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ICAI CA Final Result 2025 : आयसीएआय सीएचा परीक्षेचा निकाल जाहीर, जाणून घ्या कुठे आणि कसा पाहू शकता?

Ashadhi Ekadashi 2025 Live Updates : नारायण गडावर मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील व महंत शिवाजी महाराज यांच्या हस्ते शासकीय महापूजा संपन्न

ठरलं! 'चला हवा येऊ द्या' या दिवशी सुरु होणार... विनोदाच्या गँगवारमधून यंदा भाऊ कदम गायब?

जगातील सर्वात महाग अश्रू! उंटाच्या अश्रूच्या एक थेंबात 26 सापांचे विष नष्ट करण्याची ताकद, संशोधनातून माहिती समोर...

Ashadhi Ekadashi 2025 : देवशयनी आषाढी एकादशी; विठ्ठल भक्तीचा महापर्व, एकात्मता भक्ती व समर्पणाचे प्रतीक

SCROLL FOR NEXT