पुणे

दिवाळीच्या सणासाठी गावी जाणाऱ्या प्रवाशांची वाढती गर्दी

CD

दिवाळीसाठी एसटीच्या जादा गाड्या
सातारा, ता. २६ : दिवाळीच्या सणासाठी गावी जाणाऱ्या प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या सातारा विभागाने जादा एसटी गाड्यांचे नियोजन केले आहे. प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी सातारा शहरातून, तसेच जिल्ह्यातील विविध आगारांतून दीडशेहून अधिक जादा गाड्या सोडण्यात येणार आहेत. त्यामुळे दिवाळीच्या सुट्यांमध्ये प्रवाशांना दिलासा मिळणार आहे.
दिवाळीच्या काळात पुणे, मुंबईसह राज्याच्या विविध भागांतून नागरिक मोठ्या संख्येने आपल्या गावी येतात, तसेच सणानिमित्त पर्यटन आणि धार्मिक स्थळांना भेट देणाऱ्या प्रवाशांची संख्याही वाढते. या पार्श्वभूमीवर एसटी महामंडळाने प्रवाशांच्या सोयीसाठी अतिरिक्त गाड्यांचे नियोजन केले आहे. सातारा- स्वारगेट आणि स्वारगेट- सातारा या मार्गावरही जादा गाड्या सोडण्यात येणार आहेत. पुणे आणि सातारा दरम्यान प्रवास करणाऱ्या चाकरमान्यांसह विद्यार्थी व इतर प्रवाशांना याचा फायदा होणार आहे. याशिवाय सातारा आणि जिल्ह्यातील विविध डेपोतून रत्नागिरी, चिपळूण, सिंधुदुर्ग यांसह राज्यातील विविध ठिकाणी जादा गाड्या धावणार आहेत. सातारा विभागाच्या नियोजनानुसार दिवाळीच्या गर्दीच्या कालावधीत या गाड्या टप्प्याटप्प्याने सोडण्यात येणार आहेत. प्रवाशांची संख्या आणि मागणी लक्षात घेऊन गाड्यांचे नियोजन करण्यात आले आहे. त्यामुळे दिवाळीच्या सणाला प्रवाशांनी एसटीने प्रवास करण्याचे आवाहन एसटी प्रशासनाने केले आहे.
....
कोट -
दिवाळीच्या सणात प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन सातारा विभागातून जादा एसटी गाड्यांचे नियोजन करण्यात आले आहे. जिल्ह्यांतर्गत, परजिल्हा व कोकण भागात सोडण्यात येणारे एसटी सेवेचा प्रवाशांनी लाभ घ्यावा.
- ज्योती गायकवाड, विभाग नियंत्रक
-----

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai News: मुंबईत जागतिक दर्जाचे मरीना उभारणार, ९२३ कोटींचा प्रकल्पाची घोषणा; सुरक्षिततेला प्राधान्य

Beed Crime : चमत्काराचा बहाणा करून वृद्धाला लुबाडणारा सराईत जेरबंद; परळी बसस्थानकातील अंगठी लांबवणाऱ्या नाशिकच्या ठगास एलसीबीच्या बेड्या

Maharashtra Live News: छत्रपती कारखान्याचे १५ दिवसात १ लाख ७३५३ टन उसाचे गाळप

E-Bus Fire : पुण्यात चालत्या ई-बसला आग; १७ प्रवाशांचा जीव थोडक्यात बचावला!

दिल्लीतील धुक्याचा भारत श्रीलंका वनडे सामन्याला फटका बसणार? रोहित विराटच्या चाहत्यांची धाकधूक वाढली, सामना दुसरीकडे हलवण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT