सकाळ न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली, ता.२० ः गेल्या काही दिवसांपासून तीव्र उष्णतेच्या लाटेच्या विळख्यात सापडलेली राजधानी दिल्ली आणि राष्ट्रीय राजधानी क्षेत्रातील सर्व शहरांमध्ये आज ४४ ते ४६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. हवामान खात्यानेही ‘यलो अलर्ट’ ऐवजी ‘ऑरेंज अलर्ट’चा इशारा देत उष्णतेच्या लाटेवर शिक्कामोर्तब केले.
हवामान खात्याच्या अंदाजानुसार पुढील काही दिवस दिल्ली आणि आसपासच्या भागात उष्णतेची लाट अशीच तीव्र राहील आणि तापमान ४५ ते ४६ अंश सेल्सिअसच्या आसपास कायम राहण्याची शक्यता आहे. दिल्लीत यंदाच्या हंगामातील सर्वाधिक तापमानाची नोंद झाली असून, सफदरजंग आणि पालम सारख्या मुख्य हवामान केंद्रांवर तापमान ४४ अंश सेल्सिअसच्या पार गेले, तर मुंगेशपूर आणि रिज यांसारख्या काही भागांमध्ये पारा तब्बल ४६ अंश सेल्सिअसच्या आसपास पोहोचला. रात्रीचे किमान तापमानही नेहमीपेक्षा जास्त म्हणजेच अंदाजे २७ ते २९ अंश सेल्सिअस एवढे नोंदविले गेले असून, उत्तर आणि मध्य भारतातील अनेक राज्यांमध्ये, विशेषतः उत्तर प्रदेश, राजस्थान आणि हरियाणामध्येही अशीच भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.