SGW26B09324
सांगोला : येथील फॅबटेक कॉलेज ऑफ पॉलिटेक्निकच्या विजयी संघातील खेळाडूंचा सन्मान करताना इस्टेट डायरेक्टर डॉ. संजय आदाटे, प्राचार्य तानाजी बुरुंगले व इतर.
.......
फॅबटेक पॉलिटेक्निक
व्हॉलिबॉल स्पर्धेत विजयी
सांगोला, ता. २१ : सी-झोन इंटर इंजिनिअरिंग डिप्लोमा स्टुडंट स्पोर्ट्स असोसिएशन अंतर्गत हॉलिबॉल स्पर्धा सोलापूर येथे नुकतीच पार पडली. या स्पर्धेत सांगोला येथील फॅबटेक कॉलेज ऑफ पॉलिटेक्निकच्या विद्यार्थ्यांनी विजय प्राप्त केला असल्याची माहिती प्राचार्य तानाजी बुरुंगले यांनी दिली.
या स्पर्धेत स्पर्धेत एकूण ४ संघ सहभागी झाले होते. यामध्ये फॅबटेक पॉलिटेक्निकमधील मुलींच्या संघाने चुरशीच्या लढतीत यश संपादन केले आहे. खेळाडूंच्या यशाबद्दल संस्थेचे उपाध्यक्ष भाऊसाहेब रूपनर, सचिव डॉ. अमित रूपनर, प्राचार्य तानाजी बुरुंगले, क्रीडाशिक्षक प्रा. बिरा वगरे यांच्यासह शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी सन्मान केला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.