SGW26B09424
सांगोला : येथील फॅबटेक पाॅलिटेक्निकमधील व्हॉलिबाॅल स्पर्धेत राज्यस्तरीय विजय प्राप्त केल्याबद्दल संघाचे अभिनंदन करताना सचिव डाॅ. अमित रूपनर, इस्टेट डायरेक्टर डाॅ. संजय आदाटे, प्राचार्य तानाजी बुरुंगले आदी.
---
राज्यस्तरीय व्हॉलिबॉल स्पर्धेत
फॅबटेक पाॅलिटेक्निक विजयी
सकाळ वृत्तसेवा
सांगोला, ता. ७ : फॅबटेक काॅलेज ऑफ पाॅलिटेक्निक महाविद्यालयातील विद्यार्थिनींनी बीड (माजलगाव) येथे आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय मुलींच्या व्हॉलिबाॅल स्पर्धेत प्रथम क्रमांक प्राप्त केला. यामुळे महाविद्यालयाच्या यशात मानाचा तुरा रोवला असल्याची माहिती प्राचार्य तानाजी बुरुंगले यांनी दिली.
आयडीईएसएसए अंतर्गत राज्यस्तरीय व्हॉलिबाॅल स्पर्धेमध्ये महाराष्ट्र राज्यातील १४ झोनमधून १४ संघांनी सहभाग घेतला होता. राज्यस्तरीय व्हॉलिबाॅल स्पर्धेत सांगोला येथील फॅबटेक काॅलेज ऑफ पाॅलिटेक्निक महाविद्यालयातील विद्यार्थिनींनी महाराष्ट्र राज्यात प्रथम क्रमांक प्राप्त केला असून, स्पर्धेत आपल्या कौशल्याची छाप पाडून उल्लेखनीय कामगिरी करून आत्मविश्वासाच्या जोरावर विजय प्राप्त केला आहे.
या यशाबद्दल संस्थेचे सचिव डाॅ. अमित रूपनर यांच्या हस्ते विजयी संघाचा सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. तसेच फॅबटेक टेक्निकल एज्युकेशन सोसायटीच्या अध्यक्षा नीलवर्णा रूपनर, उपाध्यक्ष भाऊसाहेब रूपनर, इस्टेट डायरेक्टर डॉ. संजय आदाटे, प्राचार्य तानाजी बुरुंगले, क्रीडाशिक्षक प्रा. बिरा वगरे, प्रा. सविता वाघमोडे आदींसह महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.