Ajit Pawar News Updates Ajit Pawar
पुणे

येत्या वर्षभरात बारामतीचा चेहरामोहरा बदलणार- अजित पवार

आगामी वर्षभरात बारामतीचा चेहरामोहरा बदलून जाणार असून अधिक सुंदर व परिपूर्ण शहर होईल असा विश्वास उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बोलून दाखविला.

मिलिंद संगई,

आगामी वर्षभरात बारामतीचा चेहरामोहरा बदलून जाणार असून अधिक सुंदर व परिपूर्ण शहर होईल असा विश्वास उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बोलून दाखविला.

बारामती - आगामी वर्षभरात बारामतीचा (Baramati) चेहरामोहरा बदलून (Changes) जाणार असून अधिक सुंदर व परिपूर्ण शहर (City) होईल असा विश्वास उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी बोलून दाखविला. पंचायत समितीच्या नूतन वास्तूच्या उदघाटनप्रसंगी केलेल्या भाषणात अजित पवार यांनी बारामतीच्या सर्वांगिण विकासासाठीचा आपला संकल्प पुन्हा अधोरेखीत केला. शहर आणि तालुक्यातील महत्वाच्या समस्या दूर करण्याची ग्वाही त्यांनी दिली.

ते म्हणाले, विकासकामे करताना काही ठिकाणी काही कठोर निर्णय घ्यावे लागतात, मात्र बारामतीतील कोणालाही वा-यावर सोडणार नाही हा शब्द मी शरद पवार यांच्या साक्षीने देत आहे. स्ट्रीट लाईटच्या थकबाकीविषयी बोलताना ते म्हणाले, पुणे जिल्ह्यात स्ट्रीट लाईटची थकबाकी तब्बल 525 कोटी रुपये इतकी आहे, या स्थितीत आमचे सरकारच काय ब्रम्हदेव आला तरी काही होऊ शकणार नाही. किमान जी वीज वापरली आहे त्याचे तरी पैसे भरावेच लागतील, त्या शिवाय नव्याने जोडणी मिळणार नाही.

दरवर्षी निवडणूक आली की विरोधक टँकर व पाण्याचा मुद्दा काढतात. तालुक्यासाठी अशा योजना दिल्या आहेत की त्यातून पिण्याच्या पाण्याचा प्रश्न संपुष्टात येणार असून पुढच्या निवडणूकीला विरोधकांना टीका करायला पाण्याचा मुद्दाच शिल्लक ठेवणार नाही, असा संकल्पच अजित पवार यांनी बोलून दाखविला.

दरम्यान शहरातील श्रीमंत बाबूजी नाईक वाड्याचे सहा महिन्यात रूप बदलून टाकण्याचाही निर्धार त्यांनी बोलून दाखविला. हे काम वेगाने सुरु असून संध्याकाळी चार क्षण बारामतीकरांना निवांतपणे तेथे व्यतित करता येतील, असे त्याचे स्वरुप करणार असल्याचे ते म्हणाले. बारामतीचे बसस्थानक राज्यातील पहिल्या पाच बसस्थानकांपैकी एक असेल.

अजित पवारांचेही असेही वृक्षप्रेम....

शहरात नीरा डावा कालव्याच्या शेजारी नव्याने झाडे लावली आहेत, कृपया कोणीही त्याचे शेंडे मोडू नयेत असे आवाहन करताना ते म्हणाले की तुम्ही सवयी बदला, तुम्ही बदलला नाही तर मीही बघतो की तुम्ही शेंडे मोडून दमता की मी झाडे लावून दमतो ते......त्यांचे झाडांप्रती असलेले प्रेमच यातून पुढे आल्याची नंतर चर्चा होती.

सहकार्याची भूमिका घ्यावी...

एसटी कर्मचा-यांच्या वेतनात बदल करुन इतर राज्यांप्रमाणे ते केलेले आहेत, जी मदत करणे शक्य होते ती सरकारने केलेली आहे, त्या मुळे आता संपाची भूमिका बाजूला ठेवून एसटी कर्मचा-यांनी सहकार्याची भूमिका घ्यावी, असेही आवाहन अजित पवार यांनी केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

US Citizenship: जन्मसिद्ध नागरिकत्वावर ट्रम्प यांचा डाव फसला! आदेशाला अमेरिकन सर्वोच्च न्यायालयाचा ब्रेक; बर्थराइट सिटिझनशिप कायम

भाजपात अंतर्गत कुरघोडीचे राजकारण? नवनियुक्त शहराध्यक्षांच्या नियुक्तीला २४ तासांतच स्थगिती, नेमकं काय घडतंय?

Balen Shah News: नेपाळमध्ये नवा राजकीय वाद! बालेन शाहांच्या पक्षात ३५ हजार अल्पवयीन सदस्य? अडचणीत वाढ होणार

IND vs ENG 1st T20I: इंग्लंडने पहिला डाव टाकला; खचलेल्या टीम इंडियाला टक्कर देणारी प्लेइंग XI जाहीर; जोफ्रा नसला तरी...

Arabian Sea Monsoon : अरबी समुद्रात मॉन्सून तीव्र; ३ ते ६ जुलैदरम्यान मुंबई-उत्तर कोकणात अतिमुसळधार पाऊस, विदर्भातील जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट

SCROLL FOR NEXT