The Face Touch Alert App has been created to prevent infection by computer engineer Prasad Seth  
पुणे

संसर्ग रोखण्यासाठी 'फेस टच अलर्ट ऍप' 

सकाळवृत्तसेवा

पुणे : संगणक किंवा मोबाईलद्वारे 'वर्क फ्रॉम होम'चा अवलंब करणाऱ्यांसाठी प्रसाद सेठ या संगणक अभियंत्याने 'फेस टच अलर्ट ऍप' विकसित केले आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या वतीने कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी काही मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. त्यापैकी एक म्हणजे 'लोकांनी चेहऱ्याला सारखा स्पर्श करू नये'. परंतु, नेहमीच्या सवयीमुळे चेहऱ्याला अनेकदा स्पर्श होतो. हा स्पर्श टाळण्यासाठी सूचना देणारे हे ऍप विकसित करण्यात आले आहे.
विकसित करण्यात आलेले हे ऍप पूर्णपणे मोफत आहे. ऍप मुळे चेहऱ्याजवळ

हात गेल्यास 'नो, नो' अशा प्रकारची सूचना तुमच्या लॅपटॉप किंवा मोबाईल मधून देण्यात येते, अशी माहिती सेठ यांनी दिली. ते म्हणाले,"आपल्या शिक्षणाचा समाजासाठी काही उपयोग व्हावा म्हणून मी हे ऍप विकसित केले. यामध्ये वापरकर्त्याला चेहऱ्याला हात लावण्यापूर्वी सूचना मिळेल पण त्याचबरोबर किती वेळा हात लावला, किती वाजता लावला याचे संपूर्ण नोंद ठेवण्यात येणार आहे.''

या ऍपमुळे कोरोना विषाणूच्या संसर्गाला काही प्रमाणात का होईना आळा बसेल असा विश्वास सेठ यांनी व्यक्त केला आहे. https://t.co/1mA0UmzcF8 या संकेतस्थळावर हे ऍप उपलब्ध आहे. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

बांगलादेशातील पीडितांवर तमिळनाडूत शस्त्रक्रिया; किडनी प्रकरणी पीडितांचा आकडा ७०च्या घरात, २०० कोटींची उलाढाल..

Silver Rate Today : चांदी दराचे सगळे रेकॉर्ड मोडणार? तज्ज्ञांच्या मतानुसार बाजारात अस्थिरता राहणार

Latest Marathi News Live Update : अजित पवार आज पिंपरी चिंचवडमध्ये; पत्रकार परिषद घेणार

Horoscope Prediction 2026: नशीब बदलणार! जानेवारीत तयार होणाऱ्या शुक्रादित्य राजयोगाने ‘या’ राशींचं आयुष्य पालटणार

Pune Crime News : पुरोगामी पुण्यात धक्कादायक प्रकार ! जीन्स घातली म्हणून सासू, दीर अन् मुलीकडून विधवेला बेदम मारहाण, हात मोडला अन्...

SCROLL FOR NEXT