bed
bed 
पुणे

कोरोना रुग्णांसाठी "जम्बो फॅसिलिटी'; लॉकडाउनमध्ये बेडच्या क्षमतेत वाढ 

सकाळवृत्तसेवा

पुणे - पुणे, पिंपरी-चिंचवड शहर आणि जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांची वाढती संख्या पाहता दर्जेदार आरोग्य सुविधा पुरविण्यासाठी सरकारी यंत्रणा, खासगी रुग्णालये आणि "पीएमआरडीए'च्या मदतीने "जम्बो फॅसिलिटी' उपलब्ध करून देण्यात येतील. यापुढे लॉकडाउन वाढविण्यात येणार नाही; परंतु व्यापाऱ्यांच्या मागणीनुसार आठवड्यातील दोन दिवसांच्या लॉकडाउनबाबत चर्चा करून लवकरच निर्णय घेतला जाईल, अशी माहिती विभागीय विशेष कार्य अधिकारी सौरभ राव आणि जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी पत्रकार परिषदेत दिली. 

महापालिका आयुक्त विक्रम कुमार, सहपोलिस आयुक्त रवींद्र शिसवे आदी यावेळी उपस्थित होते. राव म्हणाले, ""गेल्या दहा दिवसांच्या लॉकडाउन कालावधित बाधित रुग्णांचा शोध घेऊन प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यास मदत झाली. ससून रुग्णालय, नायडू, दळवी हॉस्पिटल, रूबी आणि बुधराणी रुग्णालयात बेड वाढ करण्यात आली. रुग्णांना आयसीयू कक्ष, ऑक्‍सिजन बेड आणि व्हेंटिलेटर उपलब्ध होतील, यासाठी प्रयत्न सुरू आहेत.'' 

""ससून रुग्णालयात पुरेसे डॉक्‍टर, वैद्यकीय कर्मचारी उपलब्ध करून देण्याबाबत नियोजन करण्यात आले आहे. येत्या 15 ऑगस्टपर्यंत आरोग्य सुविधांमध्ये वाढ होईल. रुग्णांकडून जादा शुल्क आकारणी करणाऱ्या खासगी रुग्णालयांना नोटीस पाठविण्यात आली आहे; परंतु तांत्रिक अडचणी आणि संकटाच्या कालावधित सर्वांचे सहकार्य घेण्याच्या उद्देशाने कायदेशीर कारवाई करण्यात आलेली नाही,'' असे राव यांनी सांगितले. 

मुंबईच्या धर्तीवर कोरोनाचा प्रादुर्भाव नियंत्रणात आणण्यासाठी खासगी रुग्णालयांची तपासणी, रुग्णवाहिकांची उपलब्धता, बाधित रुग्णांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींचा शोध घेऊन चाचणी करण्यावर भर देण्यात येत असल्याचे जिल्हाधिकारी राम यांनी सांगितले. 


80 टक्के - खासगी रुग्णालयात आरक्षित बेड 
305  - व्हेंटिलेटर 
600 -  ऑक्‍सिजन बेड 
950  - ससूनमधील बेड 

शहरात जुलैअखेर 27 हजार रुग्ण 

पुणे महापालिका हद्दीत 31 जुलैअखेर 27 हजार कोरोनाबाधित ऍक्‍टिव्ह रुग्ण असतील. त्यापैकी 24 हजार बाधित रुग्णांना कोविड केअर सेंटरमध्ये ठेवण्यात येईल. तर, तीन हजार रुग्णांवर रुग्णालयांमध्ये उपचार करण्यात येतील. शिवाय मागील काही रुग्णांची संख्या लक्षात घेता बेड वाढविण्यावर भर देण्यात येत असल्याचे सौरभ राव यांनी सांगितले. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Arvind Kejriwal: नायब राज्यपालांकडून केजरीवाल पुन्हा टार्गेट! खलिस्तान्यांकडून पैसा घेतल्याची केली NIAकडं तक्रार

Team India Jersey: T20 वर्ल्ड कपमध्ये टीम इंडिया दिसणार नव्या रुपात, नवी जर्सी झाली लाँच; पाहा Video

IPL 2024 MI vs SRH Live Score: मुंबईला दुसऱ्याच षटकात मोठा धक्का! इशान किशन झाला आऊट

Hires Women to Seduce Men: पबमध्ये पुरुषांना भुरळ घालण्यासाठी महिलांची नियुक्ती; पोलिसांच्या छाप्यात धक्कादायक प्रकार उघड

Sunita Williams News : अभिमानास्पद! सुनीता विल्यम्स पुन्हा घेणार अंतराळात झेप; सोबत नेणार भगवद्‍गीता अन् 'ही' खास मूर्ती

SCROLL FOR NEXT