Money 
पुणे

#Lockdown2.0 : ... या कारणामुळे येऊ शकते पगार कपातीचे संकट

सकाळवृत्तसेवा

पिंपरी - कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्यामुळे लावण्यात आलेल्या लॉकडाउनमध्ये आपल्याकडे व्यवसाय नसल्याचे कारण काही आयटी कंपन्यां पुढे करत आहेत, त्यामुळे त्याठिकाणी काम करणारे कर्मचारी पगार कपात होणार का, या चिंतेने ग्रासले आहेत. दरम्यान, यासंदर्भात अनेक कर्मचाऱ्यांनी पुढे येत राष्ट्रीय माहिती तंत्रज्ञान कर्मचारी सेनेकडे तक्रार नोंदवली आहे.

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यानंतर आयटी कंपन्यांनी कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होमची सवलत देत घरुन काम करण्यास सांगितले. त्यानंतर काही कंपन्यांनी आपल्याकडे व्यवसाय नसल्याचे कारण पुढे करत कर्मचाऱ्यांना सक्‍तीने रजा घेण्यास सांगितले. दरम्यान, लॉकडाउनचा कालावधी तीन मे पर्यंत वाढल्यामुळे काही कंपन्यांनी कर्मचाऱ्यांना पगार कपातीचे संकेत दिले आहेत. त्यामुळे धास्तावलेल्या या कर्मचाऱ्यांनी यासंदर्भात आमच्याकडे तक्रार दिली असल्याचे राष्ट्रीय माहिती तंत्रज्ञान कर्मचारी सेनेचे सरचिटणीस हरप्रीत सलुजा यांनी सांगितले. 

दरम्यान, केंद्र आणि राज्य सरकारने खासगी कंपन्यांना लॉकडाउनच्या कालावधीत कर्मचाऱ्यांचा पगार कमी करु नका, कोणालाही कामावरुन कमी करु नका, असे आदेश दिले आहेत. मात्र, असे असताना देखील काही कंपन्या व्यवसाय नसल्याचे कारण पुढे अनेक कारणे सांगत असल्याने या कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. आयटी कर्मचाऱ्यांकडून येणाऱ्या तक्रारी आम्ही कामगार आयुक्‍तांपर्यंत पोहोचवत असल्याचे सलुजा यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs WI 3rd ODI: २-० ने मालिका जिंकली अन् आता टीम इंडियात होणार मोठा फेरबदल? तिसऱ्या वनडेत ‘या’ स्टार्सची एन्ट्री, कोण होणार OUT?

Pune News : पुण्यात २२ तासांत १२३ मुलींचे अपहरण झाल्याचा दावा खोटा; सोशल मीडियावरील ती ‘रील’ निराधार, अफवांवर विश्वास न ठेवण्याचे पोलिसांचे आवाहन

Latest Marathi News Live Update : भारताच्या लेकींनी रचला इतिहास! चीनचा पराभव, ४४ वर्षांनंतर हॉकीत सूवर्णपदक

Custard Apple Season : धारूरचा हंगाम संकटात! दुष्काळाने सीताफळाचा गोडवा हिरावला; मजुरांच्या रोजगारावर होणार परिणाम

Aundha Nagnath Temple : औंढा नागनाथ मंदिर भाविकांसाठी महिनाभर बंद; नित्यपूजा मात्र सुरू राहणार

SCROLL FOR NEXT