Devendra Fadnavis sakal
पुणे

Devendra Fadnavis : पराभवाच्या शक्यतेने विलीनीकरणाची भाषा; फडणवीस यांची शरद पवार यांच्यावर टीका

‘‘बारामती मतदारसंघात मतदान झाले आणि शरद पवार यांना कळून चुकले की, आता आपले काही खरे नाही. आता राजकीय हवा महायुती आणि अजित पवार यांच्या बाजूने वाहू लागली आहे. आपला पराभव निश्चित आहे.

सकाळ वृत्तसेवा

पिंपरी : ‘‘बारामती मतदारसंघात मतदान झाले आणि शरद पवार यांना कळून चुकले की, आता आपले काही खरे नाही. आता राजकीय हवा महायुती आणि अजित पवार यांच्या बाजूने वाहू लागली आहे. आपला पराभव निश्चित आहे. म्हणून ते प्रादेशिक पक्षांची काँग्रेसमध्ये विलीनीकरणाची भाषा बोलत आहेत,’’ असा आरोप उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी (ता. १०) भोसरीतील सभेत केला.

महायुतीतील राष्ट्रवादी काँग्रेसचे शिरूर लोकसभा मतदारसंघातील उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या प्रचारार्थ भोसरीत आयोजित सभेत फडणवीस बोलत होते. आढळराव यांच्यासह आमदार महेश लांडगे, अश्विनी जगताप, उमा खापरे, माजी आमदार विलास लांडे, मंगलदास बांदल आदी उपस्थित होते. फडणवीस म्हणाले, ‘‘पंतप्रधानपदी नरेंद्र मोदी पुन्हा विराजमान होतील, तेव्हा शहरातील रेडझोनचा प्रश्न सोडविण्यासाठी संरक्षणमंत्र्यांना प्रसंगी मोदी यांना भेटू आणि सर्व मिळून हा प्रश्न सोडवू. इंद्रायणी नदी प्रदूषणमुक्त करायची आहे. हिंजवडी ते भोसरी-चाकण मेट्रोने जोडणार आहोत. चाकणमधील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी तीन मजली उड्डाण पुलाचे नियोजन आहे. पीएमपीच्या ताफ्यात ई-बसची संख्या वाढवून पर्यावरण पूरक काम करायचे आहे.’’

पंतप्रधानपदासाठी ते संगीत खुर्ची खेळतील

नरेंद्र मोदी आमच्या महायुतीचे पंतप्रधानपदाचे उमेदवार आहेत. इंडिया आघाडीकडे असा नेताच नसल्याने ते संगीत खुर्ची खेळतील आणि पाच वर्षांत पाच पंतप्रधान देतील, अशी टीका करत फडणवीस यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ. अमोल कोल्हे यांच्यावरही हल्लाबोल केला. निवडणूक झाल्यानंतर ते नाटके करतात आणि जनतेला विसरतात. ते ‘फ्लॉप’ ठरले आहेत, त्यांना आता पुन्हा संधी द्यायची नाही. कारण ते चांगले कलाकार आहेत. पण, चांगले खासदार होऊ शकले नाहीत, असा टोलाही फडणवीस यांनी लगावला.

महेश लांडगे म्हणाले...

  • महायुतीच्या सरकारमुळे प्राधिकरण बाधित भूमिपुत्रांना साडेबारा टक्के परतावा

  • मिळकतकरासोबत कचरा संकलनासंदर्भातील उपयोगिता शुल्क आकारणी रद्द

  • पंतप्रधान आवास योजनेतून घरे, पोलिस आयुक्तालय, आंद्रा, भामा-आसखेड पाणी योजना सुरू

  • पिंपरी-चिंचवडमधील सर्व प्रश्न सुटलेत, फक्त रेड झोनचा प्रश्न मार्गी लावावा

आढळराव पाटील म्हणाले...

  • मतदारसंघासाठी आलेला निधी खर्च न करणारा खासदार आपण पाच वर्षे पाहिला

  • आमच्यासाठी काय केले, असे लोक महाविकास आघाडीच्या उमेदवाराला विचारताहेत

  • विकासाबाबत सांगण्यासारखे एकही काम त्यांनी केलेले नाही

  • गेली वीस वर्षे धनुष्यबाणाशी एकनिष्ठ राहिलो, आता महायुतीचा जागा वाटपाचा निर्णय म्हणून घड्याळाच्या चिन्हावर लढतोय

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

World Heritage status: शिवरायांच्या किल्ल्यांना 'युनेस्को'चा दर्जा मिळण्यास का लागतोय वेळ? गडांच्या व्यवस्थापनावर समितीने ठेवलं बोट

Mumbai News: जैन मंदिरावरील कारवाई योग्यच, उच्च न्यायालयाने ट्रस्टचे अपील फेटाळले

Thane News: ठाण्यात उभी राहणार ग्रीनवॉल! पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी वृक्ष प्राधिकरण विभागाचा निर्णय

Mumbai News: नागरिकांची वाहतूक कोंडीतून होणार सुटका, वेसावे ते भाईंदर कोस्टल रोडच्या कामाला वेग

Latest Maharashtra News Live Updates: देश-विदेशासह राज्यात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर

SCROLL FOR NEXT