Sharad Pawar And Devendra Fadnavis esakal
पुणे

Sharad Pawar on Fadnavis: "फडणवीसांचं महत्व वाढवायचं नाही"; पहाटेच्या शपथविधीवर अखेर पवार बोलले

पहाटेच्या शपथविधीबाबत शरद पवारांना माहिती होतं असा दावा नुकताच फडणवीस यांनी केला होता.

सकाळ डिजिटल टीम

पुणे : देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या पहाटेच्या शपथविधीबाबत शरद पवारांना माहिती होतं असा दावा नुकताच फडणवीस यांनी केला होता. यावर सुरुवातीला शरद पवारांनी प्रतिक्रिया देणं टाळलं होतं, पण आज त्यांनी यावर भाष्य केलं असून फडणवीसांचं महत्व वाढवण्याची गरज नाही, असं त्यांनी म्हटलं आहे. (Fadnavis Pawar swearing in ceremony Sharad Pawar speaks on claim of Fadnavis)

पत्रकारांशी बोलताना पवार म्हणाले, "पहाटेच्या शपथविधीबाबत त्यांनाच विचारायची गरज आहे की, इतक्या दिवसांनी त्यांनी हे प्रकरण का काढलं? त्यांच्या वक्तव्याला उत्तर देऊन मी त्यांचे महत्त्व वाढवणार नाही"

सत्ता संघर्षावर केलं भाष्य

महाराष्ट्रातील सत्ता संघर्षावर सुप्रीम कोर्टात नुकतीच सुनावणी झाली. यावर भाष्य करताना पवार म्हणाले, मी ऐकलं की मंगळवारी याचा निर्णय येऊ शकतो. बघू आता मंगळवारी काय होतं ते इंटरेस्टिंग आहे. काय होतं हे सांगणं अवघड आहे.

गिरीश बापट यांचा राजकीय प्रचार म्हणजे....

खासदार गिरीश बापट हे आजारी असतानाही भाजपनं त्यांना पोटनिवडणुकीच्या प्रचारात उतरवल्यानं भाजपवर चौफेर टीका होत आहे. यावरही शरद पवार यांनी भाष्य केलं आहे. पवार म्हणाले, "त्यांना प्रचारात आणणं ही भाजपची गरज होती का? ठाऊक नाही. पण मी गिरीश बापट यांना भेटून आलो होतो, त्यांची प्रकृती पाहता त्यांच्या यातना वाढू नये हीच अपेक्षा आहे"

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Crop Insurance: दुष्काळ जाहीर झाला! पीक विम्यासाठी काय करावं? किती पैसे मिळणार? पाहा संपूर्ण गणित

Asian Games 2026: अरे आवाजsss कुणाचा... भारतीय पुरुष कबड्डी संघाने जिंकले नववे सुवर्णपदक; रोमहर्षक लढतीत इराणवर विजय

Mumbai-Pune Expressway: मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर पुन्हा अपघात! थांबलेल्या टँकरला धडकून कारचा चुराडा, एकाचा मृत्यू

Dattatray Bharne Drought Relief : महाराष्ट्रातील दुष्काळावर कृषीमंत्री दत्तात्रय भरणे काय म्हणाले? किती टप्प्यात मदत करणार?

पुण्यात पोलिसाने गोळी झाडून घेत आयुष्य संपवलं, PMPLच्या बस डेपोत आढळला मृतदेह; ३ दिवसांपासून होते बेपत्ता

SCROLL FOR NEXT