पुणे

फडतरे नॉलेज सिटीच्या विद्यार्थ्यांचे यश

CD

वालचंदनगर, ता. २३ : कळंब (ता. इंदापूर) येथील फडतरे नाॅलेज सिटीमधील इंजिनिअरिंग ॲन्ड टेक्नॉलॉजी व डी.फार्मसीच्या विद्यार्थ्यांनी परीक्षेमध्ये घवघवीत यश मिळविले. इंजिनिअरिंग महाविद्यालयाचा ९१ टक्के व फार्मसीचा ८८ टक्के निकाल लागला.
कळंब येथील फडतरे नॉलेज सिटीअंतर्गत कार्यरत असलेल्या बाबासाहेब फडतरे इंजिनिअरिंग ॲंड टेक्नॉलॉजी महाविद्यालयातील प्रथम, द्वितीय व तृतीय वर्षाचा निकाल नुकताच जाहीर झाला. इंजिनिअरिंग महाविद्यालयाचा निकाल ९१ टक्के लागला आहे. प्रथम वर्षामध्ये सौरभ अनिल देवकाते याने प्रथम, मीनाक्षी बजरंग पांढरे हिने द्वितीय व प्रज्वल सतीश चव्हाण याने तृतीय क्रमांक मिळविला. द्वितीय वर्षामध्ये काॅम्यप्युटर इंजिनिअरिंग शाखेतून अभिज्ञ विकास धायगुडे, मॅकेनिकल इंजिनिअरिंग शाखेतून सौरभ महादेव नरसाळे, ई.ॲन्ड टी.सी. इंजिनिअरिंग शाखेतून प्रथम क्रमांक दिक्षा बापूराव डाेंबाळे, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग शाखेतून श्रीपाद विनायक वनारसे, सिव्हिल इंजिनिअरिंग शाखेतून तुषार अण्णा जाधव व संकेत सुमंत नलवडे यांनी प्रथम क्रमांक मिळविले. तृतीय वर्षामध्ये ई.ॲन्ड टी.सी. इंजिनिअरिंग शाखेतून समृद्धी सुनील सावंत, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग शाखेतून निखिल सुदाम कुताळ यांनी प्रथम क्रमांक पटकावले.
तसेच, कै. लक्ष्मीबाई फडतरे फार्मसीच्या डी. फार्मसीचा निकाल ८८ टक्के लागला. प्रथम वर्षामध्ये सविता पावलकर हिने प्रथम, अमृता जाधव हिने द्वितीय, निकिता गावडे हिने तृतीय क्रमांक पटकावला. डी. फार्मसीच्या द्वितीय वर्षामध्ये चांदणी मोरे हिने प्रथम, अहिल्या वाघमोडे हिने द्वितीय व शारदा गायकवाड हिने तृतीय क्रमांक पटकावला.


फडतरे नॉलेज सिटीचे अध्यक्ष उत्तम फडतरे, सचिव दत्तात्रेय फडतरे, फार्मसीचे प्राचार्य प्रवीण उत्तेकर, इंजिनिअरिंगच्या प्राचार्य डॉ. सोनाली देशमुख यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Rain Update: मान्सूनची आगेकूच! महाराष्ट्रात पुढील दोन दिवस वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाची शक्यता; IMD ची मोठी अपडेट

मुंबई किंवा पुणे नाही तर अनुश्री मानेने 'या' ठिकाणी खरेदी केलंय हक्काचं घर; 'या' कलाकारांनी दिली भेट; व्हिडिओ व्हायरल

'राजा शिवाजी'चा ओटीटीवर धडाका! घरबसल्या पाहता येणार, पण कधी आणि कुठे?

पुण्याची 'सोनम'! केतन पाय घसरून पडला नाही, खून झाला; लोहगडावर काय घडलं? तरुणीसह प्रियकराला अटक

Who Will Lead DC? रिषभ पंत, लोकेश राहुल, अक्षर पटेल... IPL 2027 मध्ये दिल्ली कॅपिटल्सचे नेतृत्व कोण करणार? 'दादा' सर्व निर्णय घेणार

SCROLL FOR NEXT