Pune News 
पुणे

Pune News : स्वतः UPSC फेल होता पण IAS अधिकारी बनून... पुण्यातील तोतयाने अस काही केलं की...

अनिल सावळे, सकाळ वृत्तसेवा

पुणे : पंतप्रधान कार्यालयात सचिव पदावर गोपनीय विभागात कार्यरत असल्याचे भासविणाऱ्या तोतया आय.ए.एस. अधिकाऱ्याला गुन्हे शाखेच्या युनिट एकच्या पथकाने अटक केली. हा तोतया अधिकारी उच्चशिक्षित असून, पुण्यात एका कार्यक्रमासाठी पाहुणे म्हणून आल्यानंतर त्याचे बिंग फुटले.

वासुदेव निवृत्ती तायडे (वय ५४, रा. रानवारा रो हाऊस, तळेगाव दाभाडे) असे त्याचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, औंध येथील सिंध हौसिंग सोसायटीमध्ये २९ मे रोजी बॉर्डर लेस वर्ल्ड फाउंडेशन संस्थेच्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन केले होते. जम्मू काश्मीर येथे मदतीसाठी रुग्णवाहिका पाठविण्याचा लोकार्पण सोहळा होता.

या कार्यक्रमास वीरेन शहा, सुहास कदम, पी. के. गुप्ता आणि इतर विश्वस्त उपस्थित होते. या कार्यक्रमात पाहुणे म्हणून आलेल्या एका व्यक्तीने त्याचे नाव डॉ. विनय देव असे सांगितले. ते स्वत: आय.ए.एस. असून, दिल्ली येथे पंतप्रधान कार्यालयात सचिव पदावर कार्यरत असल्याचे सांगितले. चर्चेदरम्यान संस्थेच्या पदाधिकाऱ्यांना त्यांच्या आय.ए.एस. पदाबाबत संशय आला. या पदाधिकाऱ्यांनी ही बाब गुन्हे शाखेकडे बोलून दाखवली. त्यानंतर गुन्हे शाखेच्या युनिट एकच्या पोलिसांनी या तोतयाला तळेगाव दाभाडे येथील घरातून ताब्यात घेतले.

पोलिस आयुक्त रितेश कुमार, पोलिस सहआयुक्त संदीप कर्णिक, अतिरिक्त आयुक्त रामनाथ पोकळे, पोलिस उपायुक्त अमोल झेंडे, सहायक आयुक्त सुनील पवार यांच्या मार्गदर्शनाखाली युनिट एकचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक शब्बीर सय्यद, पोलिस अंमलदार राहुल मखरे, इम्रान शेख, अभिनव लडकत आणि नीलेश साबळे यांच्या पथकाने केली आहे.

हा तोतया अधिकारी मूळचा भुसावळ येथील असून, बी.कॉम. आणि एम.ए. पदवीप्राप्त आहे. त्याने यू.पी.ए.सी. परीक्षाही दिली होती. परंतु तो त्यात अपयशी ठरला. तो डॉ. विनय देव हे नाव धारण केले होते. आय.ए.एस. अधिकारी असल्याचे भासवून तो कार्यक्रमांना प्रमुख पाहुणा म्हणून हजेरी लावत होता. कोणाची फसवणूक झाली असल्यास संबंधितांनी तक्रार द्यावी.

- अमोल झेंडे, पोलिस उपायुक्त- गुन्हे शाखा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Gram Panchayat: राज्यात आडाचीवाडी ग्रामपंचायत प्रथम; पुणे जिल्हा परिषदेला दुसरा क्रमांक, मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान

२०२३मध्ये IPS बनलेल्या ३० वर्षीय अधिकाऱ्याचा राजीनामा; लव्ह मॅरेजनंतर महाराष्ट्र केडरला केलेली बदली

Maharashtra Live News : मुंबईत सीजेपीच्या आंदोलनावर पोलिसांची धरपकड

HARDIK PANDYA BIRTHDAY: हार्दिक पांड्या ऑलराउंडर कसा बनला? गर्लफ्रेंड माहिका शर्माने सांगितला आजवर कधीही न ऐकलेला किस्सा!

Palghar Crime: पालघरमध्ये ६१ वर्षीय महिलेची हत्या; घरातील सामान अस्ताव्यस्त, चोरीच्या उद्देशाचा संशय

SCROLL FOR NEXT