daund-junction 
पुणे

बनावट आरोपी प्रकरणात निरीक्षकासह उपनिरीक्षक निलंबित

प्रफुल्ल भंडारी

दौंड : दौंड लोहमार्ग न्यायालयात बनावट आरोपी उभा करून न्यायालयाची फसवणूक आणि कागदपत्रांमध्ये फेरफार केल्याप्रकरणी दौंडे रेल्वे सुरक्षा दलाचे निरीक्षक बी. बी. सिरपोर आणि उप निरीक्षक एस. एस. लोंढे यांना निलंबित करण्यात आले आहे. 

रेल्वे सुरक्षा दलाचे सहायक सुरक्षा समादेशक संजय चौधरी यांनी या बाबत माहिती दिली. ८ जुलै २०१९ ला इंद्रजित महादेव यादव (रा. बालाजीनगर, लिंगाळी, दौंड) याने रेल्वे प्रवासात एका रेल्वे तिकिट परीक्षक यांना मारहाण केली. तर त्याच्याविरूध्द दौंड रेल्वे सुरक्षा दल पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला गेला होता. सदर गुन्ह्यात रेल्वे सुरक्षा दलाचे उप निरीक्षक एस. एस. लोंढे यांनी १३ आॅगस्टला यादव याच्या सोबत तङजोङ करून इंद्रजित यादव याच्या ऐवजी रेल्वे स्थानकावरील एका अनधिकृत खाद्यपदार्थ विक्रेत्याला न्यायालयासमोर हजर केले होते. न्यायाधीश जी. एस. वर्पे यांना मूळ आरोपी आणि हजर करण्यात आलेल्या इसमाचे वय आणि चेहरापट्टी मध्ये तफावत आढळी. आणि त्यांनी हजर आरोपीचे ओळखपत्र सादर करण्यास सांगितले असता तो करू न शकल्याने हा गंभीर प्रकार उघडकीस आला. 

न्यायालयाने या प्रकरणात गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिल्यानंतर १६ आॅगस्टला रेल्वे सुरक्षा दलाने मूळ आरोपी इंद्रजित यादव यास न्यायालयासमोर हजर केले. आणि त्याला१४ दिवसांसाठी कोठडीत ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

या प्रकरणी लोहमार्ग न्यायालयाचे सहायक अधीक्षक गणेश राऊत यांनी १७ आॅगस्टला दौंड पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार एस. एस. लोंढे, इंद्रजित यादव आणि बनावट आरोपी म्हणून उभा करण्यात आलेला अज्ञात इसम यांच्याविरूध्द न्यायालयाची फसवणूक करणे, बनावट आरोपी हजर करणे आणि शासकीय कागदपत्रांमध्ये फेरफार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. 

रेल्वे सुरक्षा दलाचे निरीक्षक बी. बी. सिरपोर आणि उप निरीक्षक एस. एस. लोंढे यांना निलंबित करण्यात आले असून दोघांना रेल्वे सुरक्षा दलाच्या सोलापूर विभागीय मुख्यालयास संलग्न करण्यात आल्याची माहिती संजय चौधरी यांनी दिली.

दौंड पोलिस ठाण्याचे निरीक्षक सुनील महाडीक यांना या प्रकरणातील आरोपींच्या अटकेविषयी  विचारले असता त्यांनी संशयित आरोपी एस. एस. लोंढे व अन्य आरोपी फरार असून त्यांचा शोध सुरू असल्याची माहिती दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Marathi News: मुंबई इंडियन्स सहावे जेतेपद पटकावणार का? एक गोष्ट जी वाढवू शकते टेंशन, जाणून घ्या त्यांची बेस्ट Playing XI

Pune News: पुण्यातील बुधवार पेठेतील पोलिसांची अल्पवयीन मुलींवरील कारवाई बेकायदेशीर; तथ्यशोध समितीचा आरोप, बालहक्कांचे उल्लंघन!

Share Market Trading: शून्य ब्रोकरेज की १००% लोभ? 'मोफत' ट्रेडिंग प्लॅटफॉर्म्सचे धक्कादायक वास्तव; गुंतवणुकीआधी नक्की वाचा

'साईबाबा मला दिसले...' संकर्षण कऱ्हाडे साईचरणी नतमस्तक, अनुभव सांगताना म्हणाला...

Ram Navami: राम नवमीला एक नाही तर चक्क दोन सार्वजनिक सुट्ट्या; योगींनी का घेतला हा निर्णय ?

SCROLL FOR NEXT