पुणे

बनावट दिव्यांग प्रमाणपत्र प्रकरणातील तिघांना जामीन

CD

बनावट दिव्यांग प्रमाणपत्र
प्रकरणातील तिघांना जामीन
सकाळ वृत्तसेवा
सोलापूर, ता. ७ : बनावट दिव्यांग प्रमाणपत्र मिळवून त्याआधारे शासकीय नोकरीत लाभ घेत शासनाची फसवणूक केल्याच्या प्रकरणात अटकेत असलेल्या तिघांना न्यायालयाने जामीन मंजूर केला. मुख्य न्यायदंडाधिकारी सुनील शिंदे यांनी प्रत्येकी एक लाख रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला.
वसीम शौकत खान (वय ४२), सागर गोविंद रजपूत (वय ४२, दोघे रा. सोलापूर) आणि विजय बाबासाहेब गर्जे (वय ४८, रा. पाथर्डी, जि. अहिल्यानगर) अशी जामीन मिळालेल्यांची नावे आहेत.
फिर्यादीनुसार, राजेश भाऊसाहेब जाधव याने अहिल्यानगर जिल्हा रुग्णालयात दिव्यांग प्रमाणपत्रासाठी अर्ज केला होता. वैद्यकीय तपासणीनंतर अर्ज नामंजूर झाल्यावर त्याने सोलापूरच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये ऑनलाइन अर्ज केला. यासाठी बनावट पत्त्याचे आधार कार्ड जोडल्याचा आरोप आहे. वैद्यकीय तपासणी न करताच २० मे २०२६ रोजी ४५ टक्के अपंगत्वाचे प्रमाणपत्र मिळविल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. या प्रमाणपत्राच्या आधारे अहिल्यानगरच्या पाटबंधारे विभागात नोकरी मिळवून शासनाची फसवणूक केल्याचा आरोप आहे.
डॉ. ऋत्विक देविदास जयकर यांच्या फिर्यादीवरून सदर बझार पोलिसांनी तपास सुरू केला. याप्रकरणी आठ जणांना अटक झाली होती. तिघांच्या जामीन अर्जावर ॲड. मिलिंद थोबडे यांनी संशयितांविरुद्ध ठोस पुरावा नसून तपास पूर्णत्वास आल्याचा युक्तिवाद केला. तो ग्राह्य धरून न्यायालयाने जामीन मंजूर केला.
संशयितांतर्फे ॲड. मिलिंद थोबडे, ॲड. विनोद सूर्यवंशी, ॲड. पौर्णिमा निंगदाळे, ॲड. रमण यल्ला व ॲड. सोबन मिर्झा यांनी, तर सरकारतर्फे ॲड. अमोघसिद्ध कोरे व ॲड. वाघमारे यांनी काम पाहिले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SIR Controversy: कितीही अटक करा, देशभरात तिरंगा फडकावतच राहणार! अभिजीत दिपकेंचा कोचीत एल्गार

यंदाची दिवाळीही सीमेवरील जवानांसोबत! पंतप्रधान मोदींनी देशवासीयांना दिल्या खास शुभेच्छा, पाहा VIDEO

Payal Jhambre Case : हुंडाबळी प्रकरणाचा तपास वेगवान; पायल झांबरे प्रकरणात ३५ तोळे सोने, मोबाईल व सीसीटीव्ही फुटेज पोलिसांच्या ताब्यात, पतीसह सासू-सासऱ्याच्या कोठडीत वाढ

Latest Marathi News Live Update: शरद पवारांच्या भेटीसाठी राष्ट्रवादीचे नेते सिल्वर ओकवर; तीन तासांपासून बैठक

Gevrai Cylinder Blast Fire Accident News : गेवराईत दिवाळीत गॅस सिलिंडरच्या भीषण स्फोटात चार जण गंभीर जखमी; चार घरे व दुचाकी जळून खाक, संजयनगर भागातील दुर्घटनेने सर्वत्र हळहळ

SCROLL FOR NEXT