पुणे

नोकरीचे आमिष दाखवून फसवणूक करणाऱ्या तोतया पोलिसाला अटक

पांडुरंग सरोदे

पुणे ः पोलिसात नोकरीला असल्याची बतावणी करीत एका महिलेला तिच्या मुलास पोलिसात नोकरी लावून देतो, असे सांगून ठगाने महिलेची 67 हजार रुपयांची फसवणूक केली. याप्रकरणी समर्थ पोलिसांनी तोतया पोलिसास अटक केली. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

सुरेश ईश्वर पेडणेकर (वय 36, रा. भांडूप, मुंबई) असे अटक केलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी मंगळवार पेठेतील 42 वर्षीय महिलेने समर्थ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला व आरोपी पेडणेकर यांची एका मध्यस्थामार्फत दीड वर्षांपुर्वी ओळख झाली होती. त्यावेळी पेडणेकरने फिर्यादी महिलेस तो पोलिस असल्याची बतावणी केली होती. दरम्यान, फिर्यादी यांचा मुलागा शिकलेला असूनही त्यास नोकरी नव्हती. त्यावेळी फिर्यादीच्या मुलाला आपल्या ओळखीने पोलिसात नोकरी मिळवून देतो, असे पेडणेकरने फिर्यादीस सांगितले. फिर्यादी महिलेनेही त्याच्यावर विश्‍वास ठेवला. 

दरम्यान, मुलाला पोलिस खात्यात नोकरी लावण्यासाठी पेडणेकरने फिर्यादीकडे 80 हजार रुपयांची मागणी केली. फिर्यादीनेही मुलाला नोकरी लागेल, या आशेने पेडणेकर यास 80 हजार रुपये दिले. पैसे देऊन अनेक दिवस उलटले तरीही मुलाला पोलिसात नोकरी लागली नाही. त्यामुळे फिर्यादीने आरोपीकडे त्याबाबत चर्चा केली. त्यानंतर आरोपीने त्यांच्या बॅंकेच्या खात्यावर 12 हजार रुपये जमा केले.

त्यानंतर उर्वरीत रक्कम देण्यासाठी फिर्यादीने त्याच्याकडे तगादा लावला. तरीही त्याने फिर्यादीस पैसे देण्यास टाळाटाळ केली. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच, फिर्यादीने समर्थ पोलिस ठाण्यात जाऊन पेडणेकरविरुद्ध फिर्याद दाखल केली. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास करून आरोपीस अटक केली. दरम्यान, आरोपीने या पद्धतीने आणखी किती जणांना नोकरी लावण्याचे आमिष दाखवून त्यांची फसवणुक केली आहे, याचा तपास पोलिस उपनिरीक्षक एस.बी.जोरे करीत आहेत

(संपादन : सागर डी. शेलार)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs WI, 1st T20I: कॅप्टन श्रेयस अय्यरचं वादळी शतक! भारताचा वेस्ट इंडिजवर ३२ चेंडू राखून दणदणीत विजय, मालिकेत आघाडी

MPSC Student Agitation : अध्यक्षांच्या राजीनाम्यावर आंदोलक ठाम; विद्यार्थ्यांच्या स्वप्नांची काढली प्रतीकात्मक अंत्ययात्रा

Pune Crime : कसबा मंदिरातील दानपेटी फोडली! मध्यरात्री मंदिराचे कुलूप तोडून ६० हजारांची रोकड लंपास; आरोपीला अटक

India New Captain: भारतीय महिला संघाला मिळाली नवी कर्णधार! BCCI ने जाहीर केले ODI अन् T20I संघ, हरमनप्रीतला मिळाली जागा?

Shirur Crime : जागेचा वाद विकोपाला! भाडोत्री शुटर्सनी जागा मालकाऐवजी त्याच्या कामगारालाच घातल्या गोळ्या, कामगाराचा घटनास्थळीच मृत्यु

SCROLL FOR NEXT