Murder esakal
पुणे

Crime News : भावाचा खून करून रचला आत्महत्येचा बनाव; दोघांना अटक

आधी भावाने आत्महत्या केल्याच सांगितले. मात्र, पोलिसांना संशय आल्यावर अधिक चौकशी केली असता खुनाचा प्रकार असल्याचा प्रकार झाला उघड.

सकाळ वृत्तसेवा

आळंदी - आधी भावाने आत्महत्या केल्याचा सांगितले. मात्र, पोलिसांना संशय आल्यावर अधिक चौकशी केली असता खुनाचा प्रकार असल्याचा प्रकार उघड झाला. सख्ख्या भावानेच भावजयीच्या मदतीने भावाचा खून केल्याची घटना चऱ्होली खुर्द (ता. खेड) येथे घडली. हुजूर महमूंद सैय्यद (वय ३२) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.

ही घटना रविवारी (ता. २८) चऱ्होली खुर्द (ता. खेड) येथील ब्लूम रेसीडेन्सी येथे घडली. याप्रकरणी मयताची पत्नी सदिना हुजूर सैय्यद (वय २८), फिरोज महमूंद सैय्यद (वय ३८) उस्मानाबाद जिल्ह्यातील मासाला येथून रोजंदारीसाठी आलेल्या दिर भावजय अशा दोघा संशयितांना आळंदी येथील पोलिसांनी अत्यंत शितापीने अटक केली आहे. सय्यद कुटुंब हे मूळचे उस्मानाबाद जिल्ह्यातील आहे.

दरम्यान, याप्रकरणी सोमवारी (ता. २९) आळंदी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला. याबाबत सहायक पोलिस निरिक्षक ए. पी. लोहार यांनी फिर्याद दिली आहे. तर खूनप्रकरणी जबाब मयत हुजूर सैय्यद याच्या मुलीने दिला.

या खून प्रकरणाबाबत आळंदी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत हुजूर महमुंद सैय्यद याने धडक घेऊन स्वतः आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती आरोपी सदिना हिने पोलिसांना दिली.

मात्र घटनास्थळी भेट दिली तेव्हा मयताच्या शरिरावरिल जखमा, मयताची स्थिती आणि मयताच्या मुलीने सांगितलेल्या माहितीवरून सदिना आणि फिरोज यांनीच खून केला असावा, असा अंदाज बांधला. मयताची पत्नी सदिना हिने घटनास्थळावरिल रक्त साफ केले. तसेच कोणत्या तरी हत्याराने वार करून खून केल्याचे दिसून येत होते. याबाबतचा अधिक तपास आळंदी पोलिस करत आहे.

मुलीच्या जबानीवरून आरोपींना अटक

मयताच्या मुलीच्या जबाबावरून पोलिसांनी सदिना आणि फिरोज या आरोपींना अटक केली. सदिना आणि फिरोज यांचे दिर भावजयीचे नाते आहे. खुनाचे कारण मात्र अद्याप समजू शकले नाही. खुनातील हत्यारही अद्याप पोलिसांना मिळाले नाही. मयत हुजूर सैय्यद हा शेत मजूर होता. मुळचे उस्मानाबाद मधील सैय्यद कुटुंब रोजंदारीसाठी चऱ्होली खुर्दमध्ये आले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पहिल्या दोन सामन्यांत संधी नाही, पण आता वैभव सूर्यवंशीची बारी? श्रेयस अय्यरच्या वक्तव्याने समीकरण बदललं; तिसऱ्या T20 मध्ये खेळणार?

Bhandara Tragedy : पती पाठोपाठ एका तासात पत्नीचाही मृत्यू एकाच सरणावर दोघांवरही अंत्यसंस्कार

Solar Panel: 5kW सोलर पॅनलवरून महिन्यात किती युनिट वीज तयार होते? सबसिडी किती मिळते? पाहा संपूर्ण गणित!

Marathi News Live Updates : जरांगेंनी तब्येतीचा काळजी घ्यावी, आंदोलन हिंदु सणात अडथळा ठरेल : मंत्री शेलार

Health: गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग रोखण्यासाठी HPV लसीकरणावर भर; NCD मॉडेलमध्ये डिजिटल ट्रॅकिंगचाही समावेश

SCROLL FOR NEXT