fakira
fakira sakal media
पुणे

'फकिरा’ने गाठला साठ वर्षांत सव्वा लाख प्रतींचा टप्पा !

सकाळ वृत्तसेवा

पुणे : कोरोनाच्या महासाथीत पुस्तकांच्या विक्रीला प्रतिसाद मिळत नाही अशी सार्वत्रिक ओरड असताना अवघ्या १५ दिवसात एका पुस्तकाच्या तीन हजार प्रती विकल्या गेल्या असून पुस्तकाला आजही मागणी आहे. पुस्तकाची ही ५१ आवृत्ती असून ती दुसऱ्यांदा छापण्यात आली आहे. ही किमया केली आहे अण्णा भाऊ साठे यांच्या ‘फकिरा’ या मराठी कादंबरीनं.

मराठी माणसांच्या मनावर या कादंबरीचं गारुड आजही कायम आहे. ५१ वी आवृत्ती प्रारंभी दोन हजार त्यानंतर पुन्हा चार हजार प्रती छापल्या गेल्या. ग्रामीण वातावरण आणि ‘फकिरा’ या मातंग समाजातील तरुणाचा लढा मांडणाऱ्या या कादंबरीला त्याकाळी ज्येष्ठ साहित्यिक वि. स. खांडेकर यांनी प्रस्तावना लिहिली होती. आपल्या प्रस्तावनेत त्यांनी या कादंबरीची सौदर्यस्थळं तर स्पष्ट केलीच पण अण्णा भाऊ साठे यांच्या लेखणीतले सामर्थ्य व त्यांच्या या कादंबरीत केवळ चित्तवेधक प्रसंग नसून स्वभावचित्रण कसे आहे ते उलगडले होते.

या पुस्तकाची पहिली आवृत्ती १९५९ मध्ये वा. वि. भट यांच्या ‘अभिनव प्रकाशना’ने प्रसिद्ध केली होती. त्यानंतर दुसऱ्या आवृत्तीपासून ही कादंबरी पुण्याच्या ‘सुरेश एजन्सी’मार्फत प्रकाशित होत आहे. प्रकाशक बाळासाहेब कारले यांनी साठे यांच्या प्रेमापोटी व हे पुस्तक जास्तीतजास्त लोकांपर्यंत जावे यासाठी या पुस्तकाची किंमत सातत्याने कमी कशी राहील याची काळजी घेतली. १७६ पानांचे हे पुस्तक आजसुद्धा ते शंभर रुपयाला देत आहेत. त्यांचे चिरंजीव शैलेंद्र कारले यांनी सांगितले की आम्ही या पुस्तकाचे ई बुक करण्याच्या प्रयत्नात आहोत, या पुस्तकाचा इंग्रजी अनुवाद करण्याची इच्छा मुंबईतील एक प्राध्यापकांनी व्यक्त केली आहे. मात्र त्यांनी अद्याप आमच्याशी संपर्क साधलेला नाही. या पुस्तकाच्या प्रती साठे यांच्या जन्मगावी अर्थात वाटेगाव इथल्या घरी जाऊन त्यांच्या सूनबाई सावित्रीताई यांना देऊन आलो. या पुस्तकाशी आमच्या तीन पिढ्या जोडल्या गेल्या असून आमच्यासाठी हे पुस्तक खूप मोलाचे आहे असेही त्यांनी सांगितले.

भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार बाबासाहेब आंबेडकर यांना साठे यांनी हे पुस्तक अर्पण केले होते, ‘फकिराचे माझ्यावर ऋण होते, तो माझा होता, त्याचे कर्तृत्व सगळ्यांना समजावे’ म्हणून मी ही कादंबरी लिहिली असे साठे यांनी आपल्या मनोगतात म्हटले होते. साठे पाळण्यात असताना, फकिराशी त्यांचा संबंध आला, त्यांचा पराक्रम ऐकतच ते मोठे झाले. साठे यांची या कादंबरीच्या लेखनामागची भावना वाचकांच्या प्रतिसादामुळे नक्कीच पूर्ण झाली आहे. संगणकाच्या जमान्यातही अस्सल मातीतली ही शौर्यगाथा आजही आवर्जून वाचली जात आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iraq: इराकमध्ये समलैंगिक संबंधाना गुन्हा ठरवणारा कायदा मंजूर; तब्बल इतक्या वर्षांचा होणार तुरुंगवास

Bhandup Cash: पैशाने भरलेली व्हॅन जप्त, निवडणूक आयोगाच्या भरारी पथकाची कारवाई

Yoga Tips : मानसिक आरोग्यासाठी अन् शारिरीक तंदूरूस्तीसाठी फायदेशीर आहेत 'ही' योगासने, दररोज करा सराव

Loksabha 2024: मतदानाचा घसरलेला टक्का कुणाच्या पथ्यावर? वाचा काय सांगतो लोकसभेचा इतिहास 

Latest Marathi News Live Update: भांडूपमध्ये निवडणूक भरारी पथकाची कारवाई, पैशांनी भरलेली व्हॅन जप्त

SCROLL FOR NEXT