पुणे

फलटण हेरिटेज हाफ मॅरेथॉनचे १३ डिसेंबरला आयोजन पर्व दुसरे : ५, १० व २१ किलोमीटरच्या स्पर्धा; विजेत्यांना १० हजार, ७ हजार व ५ हजार रुपयांची पारितोषिके

CD

फलटणला हेरिटेज हाफ मॅरेथॉन

१३ डिसेंबरला आयोजन; तीन गटांत स्पर्धा


दुधेबावी, ता. १८ : फलटण रनर्स फाउंडेशनतर्फे १३ डिसेंबरला ‘फलटण हेरिटेज हाफ मॅरेथॉन २०२६’ पर्व दुसरेचे आयोजन केले आहे. फलटण शहरातील सजाई गार्डन ते गिरवी रोड या मार्गावर ही स्पर्धा होईल. पाच किलोमीटर (फन रन), १० आणि २१ किलोमीटर अशा तीन गटांत धावपटूंना सहभागी होता येईल. स्पर्धेसाठी नोंदणीची अंतिम मुदत २० नोव्हेंबरपर्यंत आहे.

फलटण शहराचा ऐतिहासिक वारसा समाजासमोर आणणे, नागरिकांत व्यायामाचे महत्त्व रुजविणे आणि शारीरिक तंदुरुस्तीबाबत जनजागृती करणे हा या मॅरेथॉनमागील प्रमुख उद्देश आहे. पाच किलोमीटरची फन रन खुल्या गटासाठी आयोजित केली आहे. तर, १० व २१ किलोमीटरच्या स्पर्धांसाठी १८ ते ३४ वर्षे, ३५ ते ४९ वर्षे आणि ५० वर्षे व त्यापुढील असे वयोगट निश्चित केले आहेत. पुरुष व महिलांसाठी स्वतंत्र बक्षीस देण्यात येणार आहेत.
दहा व २१ किलोमीटरच्या स्पर्धेत प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक पटकाविणाऱ्या धावपटूंना अनुक्रमे १० हजार, सात हजार, पाच हजार रुपये रोख पारितोषिकांसह मेडल देऊन गौरविण्यात येणार आहे, तसेच स्पर्धेत सहभागी होणाऱ्या प्रत्येक धावपटूला सहभाग पदक, टी-शर्ट, बॅग व वेलकम किट दिले जाईल.
फलटण शहरासह विविध भागांतील धावपटूंनी स्पर्धेत सहभागी होऊन आरोग्यदायी जीवनशैलीचा संदेश द्यावा, असे आवाहन फलटण रनर्स फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. रवींद्र शिंदे यांनी केले आहे. यावेळी नानासाहेब काळुखे, प्रवीण घोरपडे, अनुजा त्रिपुटे, अमित माने, डॉ. चंद्रकांत जगदाळे, चंद्रकांत सापते, अभिजित शेंडे, पराग मासाळ यांच्यासह फाउंडेशनचे सदस्य उपस्थित होते.
.......................................

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SMAT 2026: सूर्यकुमार यादव यावेळी मात्र फसला; ललित यादवच्या वादळी खेळीने मुंबईला रडवले, पण तरी हरला गोवा संघ!

Sona Mohapatra On Salman Khan : सैनिकांच्या बलिदानावरचा सिनेमा आणि 'दोन पेग'चं गाणं? सलमान खानवर सोना मोहापात्राचा संताप; म्हणाली, "कोणाच्या करिअरला..."

Latest Marathi News Live Update : मोर्शी नगरपरिषदेतील 'ओल्या पार्टी' प्रकरणी मोठी कारवाई

Success Story: आईने दागिने विकले, बापाने कर्ज काढलं; भावासाठी बहिणींनी शेतात केली मजुरी; लेकाने UPSC मध्ये मिळवली 239 वी रँक!

काँग्रेसचा अध्यक्ष, शिंदे सेनेचा उपाध्यक्ष; सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेवर सर्वपक्षीय सत्ता

SCROLL FOR NEXT