फलटणमधील ३२ गावांत
निघणार डीजेमुक्त मिरवणुका
मनोज पवार : सकाळ वृत्तसेवा
दुधेबावी, ता. १० : शांतता, सामाजिक सलोखा आणि पर्यावरणपूरक गणेशोत्सवाला प्रोत्साहन देण्यासाठी फलटण ग्रामीण पोलिस ठाण्याच्या हद्दीत राबविण्यात येत असलेल्या ‘डीजेमुक्त मिरवणूक’ आणि ‘एक गाव, एक गणपती’ उपक्रमाला ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.
फलटण ग्रामीण पोलिस ठाण्याच्या हद्दीतील मुंजवडी, उपळवे, काशीदवाडी, वडले, शेरे शिंदेवाडी, मठाचीवाडी, सरडे, वडजल, निंबळक, मुरूम, ताथवडा, तिरकवाडी, खडकी, गिरवी, राजाळे, सोनवडी बुद्रुक, ढवळेवाडी (निंबोरे), मानेवाडी, वाघोशी, पिराचीवाडी, नाईकबोमवाडी, धुमाळवाडी सासकल, भाडळी बुद्रुक, आंदरुड, वाखरी, ढवळेवाडी (आसू), विंचुर्णे, कुरवली बुद्रुक, राजुरी, मिरगाव, शिंदेनगर आणि दालवडी या ३२ गावांनी डीजेमुक्त गणेशोत्सव मिरवणुकीचा निर्णय घेतला आहे.
या उपक्रमामुळे ध्वनिप्रदूषणावर नियंत्रण ठेवण्याबरोबरच सामाजिक एकोपा वाढण्यास, पारंपरिक संस्कृतीचे जतन करण्यास आणि गणेशोत्सव अधिक शांततामय व पर्यावरणपूरक पद्धतीने साजरा करण्यास मदत होणार आहे.
सर्व गणेश मंडळे व नागरिकांनी पोलिस प्रशासनाच्या सूचनांचे पालन करून शांततामय, सुरक्षित व आदर्श गणेशोत्सव साजरा करावा, असे आवाहन फलटण ग्रामीण पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रशांत सुबनावळ यांनी केले आहे.
..............................................
१५ गावांमध्ये ‘एक गणपती’
शेरेचीवाडी, मानेवाडी, झडकबाईचीवाडी, ताथवडे, पिराचीवाडी, भाडळी बुद्रुक, तिरकवाडी, जाधववाडी, सावंतवाडी, राजळे, धुमाळवाडी, काशीदवाडी, गोळेवाडी, मांझेरी आणि उपळवे या १५ गावांनी ‘एक गाव, एक गणपती’ उपक्रमाचा निर्णय घेतला आहे.
.........................................................
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.