(दुष्काळीचे क्लीपार्ट वापरावे)
फलटण तालुक्यात पाणीटंचाई तीव्र
जनावरांच्या पाण्यासाठी धावपळ; फळबागा, खरीप पिके धोक्यात
दुधेबावी, ता. २२ : फलटण तालुक्यात पावसाने सलग दोन महिने ओढ दिल्याने तीव्र पाणीटंचाई झाली आहे. बाणगंगा धरणाची पाणीपातळी मृतसाठ्याखाली गेली असून, शेरी तलाव कोरडा पडला आहे. पिण्याच्या पाण्यासह शेती आणि जनावरांच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे.
ग्रामीण भागात जनावरांच्या पिण्याच्या पाण्यासाठी शेतकऱ्यांना धावपळ करावी लागत आहे. ज्या गावांत विहिरी आणि कूपनलिकांना मुबलक पाणी उपलब्ध आहे, त्या ठिकाणी शेतकरी ट्रॅक्टर, बैलगाडी आणि सायकलींच्या साह्याने पाणी आणून जनावरांची तहान भागवत आहेत. पाण्याची उपलब्धता कमी झाल्याने पशुधन जगविण्याचे आव्हान शेतकऱ्यांसमोर उभे राहिले आहे.
गिरवी, धुमाळवाडी, निरगुडी आणि विंचुर्णी परिसरातील सुमारे २०० हेक्टर क्षेत्रावरील फळबागांनाही पाण्याअभावी धोका निर्माण झाला आहे.
फलटण शहरासाठी पुढील जूनपर्यंत पिण्याच्या पाण्याची कमतरता भासू नये, यासाठी नीरा उजवा कालवा विभागाने दर पंधरा दिवसांनी अर्धा टीएमसी पाणी सोडण्याचे नियोजन केले आहे. मात्र, ग्रामीण भागात अनेक ठिकाणी पाणीटंचाई कायम आहे. पावसाने आणखी ओढ दिल्यास परिस्थिती अधिक गंभीर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पिण्याच्या पाण्यासह जनावरांसाठी पाणी उपलब्ध करून देणे आणि फळबागा वाचविण्यासाठी तातडीने उपाययोजना करणे आवश्यक आहे.
...........
चौकट
..........
पाच गावांना टँकरद्वारे पुरवठा...
नाईकबोमवाडी, गोळेगाव (ठाकुरकी), परहर बुद्रुक (हिंगणगाव), सासवड गावठाण आणि सासवड माळीबेंद या गावांमध्ये पाण्याची टंचाई निर्माण झाली. त्यामुळे या गावात टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू करण्यात आला आहे.
..........................................
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.