आळेफाटा, ता. ६ : आळे (ता. जुन्नर) येथे कौटुंबिक वादाचे पर्यवसान जीवघेण्या हल्ल्यात झाले. तरुणाच्या डोक्यात उलट्या कोयत्याने वार करून गावठी पिस्तुलाचा धाक दाखवत त्याला बेदम मारहाण करण्यात आली. याप्रकरणी सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला असून, एकाला अटक करण्यात आली असून, एकावर पुण्यात उपचार सुरू असून पाच जण फरार आहेत.
सुनील ऊर्फ लड्ड्या गणेश शिंदे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, पत्नीसोबत झालेल्या वादानंतर त्यांनी सासरच्या मंडळींना बोलावले होते. सोमवारी रात्री उशिरा पत्नीचा चुलत मामा विकास विठ्ठल बानखिले, विजय विठ्ठल बानखिले यांच्यासह महेश सीताराम देवकर (रा. मंचर), साई संदीप पवार, साई अनिल वाघ (रा. नारायणगाव) व अन्य दोन अनोळखी व्यक्तींनी शिंदे यांच्या घरावर चाल केली. त्यांनी शिंदे यांना घराबाहेर बोलावून धमकावले. शिंदे बाहेर येताच विकास बानखिले याने उलट्या कोयत्याने डोक्यावर मागून वार केले, तर महेश देवकर याने गावठी पिस्तूल रोखून परिसरात दहशत निर्माण केली. त्यानंतर सर्वांनी मिळून शिंदे यांना लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली.
नागरिक जमा होत असल्याचे पाहून आरोपींनी पळ काढला, मात्र महेश देवकर जमावाच्या हाती लागला. या झटापटीत तोही जखमी झाला. जखमी सुनील शिंदे आणि देवकर या दोघांनाही उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, देवकरवर पुण्यात उपचार सुरू आहेत. उपविभागीय पोलिस अधिकारी धनंजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक विश्वास जाधव पुढील तपास करत आहेत. दरम्यान, पकडण्यात आलेला आरोपी महेश देवकर याच्यावर रुग्णालयात पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. मुख्य संशयित विकास बानखिले, विजय बानखिले यांच्यासह इतर पाच फरार आरोपींचा पोलिस कसून शोध घेत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.