पुणे

बार्शीत कौटुंबिक वादातून हाणामारी

CD

बार्शीत कौटुंबिक वादातून हाणामारी

शहर पोलिसांत परस्परविरोधी फिर्यादीवरून गुन्हे दाखल

सकाळ वृत्तसेवा

बार्शी, ता. १४ : शहरातील डमरे गल्ली, भगवंत मंदिर परिसरात कौटुंबिक वादातून शनिवारी (ता. १४) दोन गटांत जोरदार हाणामारी झाल्याची घटना घडली. विवाहित महिलेला सासरच्या मंडळींकडून त्रास दिला जात असल्याच्या कारणावरून तिच्या माहेरच्या नातेवाइकांनी जाब विचारल्यानंतर वादाचे रूपांतर हाणामारीत झाल्याचे दोन्ही बाजूंच्या फिर्यादीतून समोर आले आहे. या प्रकरणात दोन्ही गटांनी बार्शी शहर पोलिस ठाण्यात एकमेकांविरुद्ध परस्परविरोधी फिर्यादी दाखल केल्या आहेत.

पहिल्या फिर्यादीनुसार, पल्लवी उमेश ढाळे (रा. रेडणी, ता. इंदापूर, जि. पुणे) यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, त्यांची बहीण मानसी हिला पतीकडून मारहाण होत असल्याची माहिती मिळाल्यानंतर त्या पती व भावासह बार्शीत आल्या. यावेळी मानसीच्या सासरच्या मंडळींना जाब विचारला असता वाद सुरू झाला. या वादात सासरे शंकर ढाळे यांनी भावाला मारण्यासाठी लोखंडी रॉड आणल्याचा, तर सनी ढाळे, शंकर ढाळे, रेश्मा ढाळे व भाग्यश्री बुराडे यांनी भावाला खाली पाडून लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसेच गळ्यातील सोन्याचे सहा मणी पडून गहाळ झाल्याचा आरोपही त्यांनी फिर्यादीत केला आहे.

दुसऱ्या फिर्यादीनुसार, सनी शंकर ढाळे यांनी दिलेल्या तक्रारीत, पत्नी मानसीला त्रास का देता, असे विचारत तिचे माहेरचे नातेवाईक घरी आले होते. यावेळी महेश आडाने, माधवी शहाणे व पल्लवी ढाळे यांनी आपले वडील शंकर ढाळे, आई रेश्मा ढाळे व आत्या भाग्यश्री बुराडे यांना हाताने मारहाण केल्याचा आरोप केला आहे. तसेच महेश आडाने याने वडिलांच्या पाठीवर दगड मारल्याचे, आत्याच्या हाताला मार लागल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. या भांडणात स्वतःच्या हातातील सोन्याची अंगठीही गहाळ झाल्याचे त्यांनी नमूद केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

New Orleans Ship Crash : मिसिसिपी नदीत क्रूझ बोटीला महाकाय टँकरची भीषण धडक! अवघ्या १५ मिनिटांत बोट उलटली; १२९ प्रवाशांचे पुढे काय झाले?

IND vs PAK Final, Video: मोहित उल्वाचा विजयी चौकार अन् भारताचा पाकिस्तानी खेळाडूंसमोर जल्लोष; आर्यवीर सेहवाग ठरला मालिकावीर

Manoj Jarange: 'पुढची क्लिप डेंजर!' जरांगेंचा नवा ऑडिओ बॉम्ब येणार? फडणवीस-शिंदेंना काय दिला इशारा?

'सहा महिने कोणी विचारलं नाही, की यूपी-बिहारच्या लोकांना बोलतात'; 'त्या' पोस्टवरून प्रशांत किशोरांची राज ठाकरेंवर टीका, काय म्हणाले?

Latest Marathi News Live Update: वसई-विरारमध्ये २४ तासांत पाच जणांचा मृत्यू; प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

SCROLL FOR NEXT