Online 
पुणे

कुटुंबकल्याणच्या साहित्य नोंदी ऑनलाइन

सकाळवृत्तसेवा

औंध - कुटुंबकल्याण विभागाच्या साहित्याच्या नोंदी आता फॅमिली प्लॅनिंग लॉजिस्टिक इन्फॉर्मेशन सिस्टीमद्वारे होणार असल्याने मागणी व पुरवठ्याची माहिती एलएमआयएस या सॉफ्टवेअरवर ऑनलाइन बघता येणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दिलीप बोरा यांनी दिली. ही माहिती वेब, मोबाईल ॲप व एसएमएस याद्वारे उपलब्ध केली जाईल असेही ते म्हणाले.

केंद्र सरकारच्या कुटुंब कल्याण विभागाकडून येणारे साहित्य राज्य, विभाग, जिल्हा परिषद, मनपा व त्यानंतर संबंधित रुग्णालय, ग्रामीण रुग्णालय या पातळीवर वाटप केले जाते. आरोग्य केंद्रात व कार्यक्षेत्रात काम करणाऱ्या नर्स, सेविका यांच्यामार्फत थेट प्रत्यक्ष लाभार्थ्यांना हे साहित्य पुरवले जाते. त्यामुळे केंद्र सरकार ते ग्रामीण रुग्णालय पातळीवर कार्यरत कर्मचाऱ्यांपर्यंत या साहित्याच्या माहितीचे आदान प्रदान सहज होणार आहे. यासंदर्भात औंध येथील जिल्हा रुग्णालयाच्या आवारामधील कुटुंब कल्याण विभागाच्या प्रशिक्षण केंद्रात पुणे विभागातील कर्मचाऱ्यांसाठी प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते. या वेळी डॉ. बोरा यांनी ही माहिती दिली. यापूर्वी सर्व नोंदी कागदोपत्री होत. त्यामुळे केंद्रीय व राज्य स्तरावर माहिती देण्यास विलंब व्हायचा. परंतु आता दिल्ली ते ग्रामीण पातळीपर्यंत कुटुंब कल्याणच्या साधनांची देखरेख व नियंत्रण ठेवणे सुलभ होणार आहे. यामुळे साहित्याचे नेमके वाटप किती झाले व किती आवश्‍यकता आहे याची माहिती मिळते व यात पारदर्शकताही राहते. या नवीन ॲपची माहिती संबंधित सरकारी यंत्रणा, संस्था, दवाखान्यातील नोंद विभागातील कर्मचारी यांना एका पासवर्डद्वारे पाहता व भरता येईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

शेतकऱ्यांना भरीव मदत मिळवून देणार : कृषिमंत्री भरणे; पीक कापणी प्रयोग पारदर्शकपणे करण्याचे निर्देश

Marathi News Live Updates : शिरोलीत मिरवणुकीत होमगार्डला धक्काबुक्की; पोलिस अधिकारी सुनील गायकवाड, शशिकांत खवरे यांच्यात वादावादी

Pune-Beed Railway : मराठवाडा-पश्चिम महाराष्ट्र जोडणारी पुणे-बीड रेल्वे धावली; 22 सप्टेंबरपासून नियमित प्रवास सुरू, पाहा संपूर्ण वेळापत्रक आणि थांबे!

काळाचौकी महागणपतीच्या मंडपात शॉक लागून ८ वर्षीय चिमुकलीसह दोघांचा मृत्यू, तिघांवर ICUमध्ये उपचार सुरू

Ganeshotsav Return Travel : बाप्पाला निरोप देऊन परतणाऱ्या चाकरमान्यांची परतीची वाट बिकट; चिपळूणमध्ये सीएनजीसाठी 10 तास प्रतीक्षा, पंपांवर वाहनांच्या लांब रांगा

SCROLL FOR NEXT