Rahul Deshpande  sakal
पुणे

Rahul Deshpande : ‘राहुल देशपांडे कलेक्टिव्ह’ची रसिकांना उत्सुकता ; ‘सकाळ’तर्फे आयोजन

सकाळ माध्यम समूहातर्फे प्रसिद्ध गायक-संगीतकार राहुल देशपांडे यांच्या ‘राहुल देशपांडे कलेक्टिव्ह’ या बहारदार संगीत मैफलीचे आयोजन करण्यात आले आहे. या मैफलीच्या तिकीट विक्रीला रसिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे. आर. डी. बर्मन आणि किशोर कुमार या दिग्गज संगीतकार व गायकांना मानवंदना, अशी संकल्पना असणाऱ्या या मैफलीची उत्सुकता रसिकांमध्ये आहे.

सकाळ वृत्तसेवा

पुणे : सकाळ माध्यम समूहातर्फे प्रसिद्ध गायक-संगीतकार राहुल देशपांडे यांच्या ‘राहुल देशपांडे कलेक्टिव्ह’ या बहारदार संगीत मैफलीचे आयोजन करण्यात आले आहे. या मैफलीच्या तिकीट विक्रीला रसिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे. आर. डी. बर्मन आणि किशोर कुमार या दिग्गज संगीतकार व गायकांना मानवंदना, अशी संकल्पना असणाऱ्या या मैफलीची उत्सुकता रसिकांमध्ये आहे.

ही मैफील २१ एप्रिलला सायंकाळी ६.३० वाजता डीपी रस्त्यावरील पंडित फार्म येथे रंगणार आहे. युवा पिढीतील आश्वासक गायक असणाऱ्या राहुल देशपांडे यांचा ‘राहुल देशपांडे कलेक्टिव्ह’ हा कार्यक्रम रसिकांमध्ये लोकप्रिय आहेच. सकाळ माध्यम समूहानेच दिवाळीनिमित्त आयोजित केलेल्या या मैफलीला रसिकांनी तुडुंब गर्दी केली होती.

विविध संगीत प्रकारांचा सुरेख मेळ असणारी ही मैफील तरुणांमध्ये तर अतिशय लोकप्रिय आहे. त्यातच यंदाच्या मैफलीच्या विशेष संकल्पनेतून राहुल देशपांडे हे हिंदी चित्रपटसृष्टीचा सुवर्णकाळ उलगडणार आहेत. त्यामुळे ही मैफील अधिकच खास ठरणार आहे. आर. डी. बर्मन. अर्थात पंचमदा आणि संगीतकार-गायक किशोर कुमार अर्थात किशोरदा यांची बहारदार गाणी या मैफलीत सादर होतील.

गिटार, की-बोर्ड, हार्मोनियम, तबला, ऑक्टोपॅड आदी वाद्यांच्या साथीने पंडित फार्मच्या हिरवळीवर निसर्गाच्या सान्निध्यात ही मैफील रंगेल. ‘राहुल देशपांडे कलेक्टिव्ह’ या मैफलीची तिकिटे आता ‘बुक माय शो’ या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. त्यासाठी सोबत दिलेला क्यूआर कोड स्कॅन करावा, असे आवाहन ‘सकाळ’ने केले आहे.

‘राहुल देशपांडे कलेक्टिव्ह’ मैफील

कधी : २१ एप्रिल

केव्हा : सायंकाळी ६.३० वाजता

कुठे : पंडित फार्म, डीपी रस्ता, कर्वेनगर

तिकीट बुक करण्यासाठी क्यूआर कोड

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan Inflation: पाकिस्तान संकटात! अन्न टंचाई, डिझेल-LPG महागाईने जनतेचं कंबरडं मोडलं

LPG Crisis : एलपीजी संकटादरम्यान सरकारने आखली मोठी रणनीती, सामान्यांना दिलासा; गॅस सिलिंडर अन् PNG बाबत महत्त्वाची अपडेट समोर

Horoscope : उद्या अश्विनी मेषेर्कचा दुर्लभ योग! मेषसह 'या' 4 राशींना आर्थिक लाभ संभवतो; महिन्याभरात होईल भरभराट, नात्यात कलाटणीचा क्षण

Bihar Politics: ''बिहारचा मुख्यमंत्री कोण होणार? भाजपचे दोन नेते ठरवणार'', प्रशांत किशोर काय बोलले?

Latest Marathi News Live Update: रत्नागिरीत बंदुकीने गोळ्या झाडून घेत युवकाची आत्महत्या

SCROLL FOR NEXT