पुणे

सुधारित -कर्जमाफी विषय

CD

‘कर्जमुक्ती’ रखडली तांत्रिक बाबींच्या चक्रव्यूहात

नागपूर विभागातील ५३ हजार ९८ शेतकऱ्यांचे प्रमाणीकरण बाकी

विनोद इंगोले : ॲग्रोवन वृत्तसेवा
नागपूर : नागपूर विभागातील सहा जिल्ह्यांत दोन लाख ३१ हजार २३४ कर्जखात्यांची माहिती कर्जमाफी योजनेसाठी अपलोड करण्यात आली आहे. त्यापैकी एक लाख ७८ हजार १३६ शेतकऱ्यांचेच आधार प्रमाणीकरण पूर्ण झाले असून, ५३ हजार ९८ शेतकऱ्यांचे प्रमाणीकरण अद्याप प्रलंबित आहे. त्यामुळे कर्जमाफीच्या प्रतीक्षेतील शेतकऱ्यांच्या अडचणी कायम असल्याचे चित्र आहे. दुसरीकडे, राज्य सरकारने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेची चौथी यादी जाहीर केली असून, त्यात विदर्भातील १७ हजार ९४२ शेतकऱ्यांचा समावेश आहे.

राज्य सरकारने २२ ऑक्टोबर रोजी चौथी यादी प्रसिद्ध केली. राज्यभरातील एक लाख १५ हजार ६९७ पात्र शेतकऱ्यांचा त्यात समावेश आहे. यापूर्वीच्या तीन याद्यांमध्ये २४ लाख ६७ हजार १३० शेतकऱ्यांचा समावेश झाला होता. चौथ्या यादीसह एकूण पात्र शेतकऱ्यांची संख्या २५ लाख ८२ हजार ८२७ झाली आहे. योजनेच्या पोर्टलवर बँकांनी ३१.१७ लाख थकीत कर्जखात्यांची माहिती अपलोड केली आहे. आतापर्यंत आधार प्रमाणीकरण पूर्ण केलेल्या १५.८५ लाख पात्र लाभार्थ्यांच्या कर्जखात्यांवर १३ हजार २७५ कोटी रुपये जमा करण्यात आले आहेत.

विदर्भाचा विचार करता अमरावती विभागात चौथ्या यादीत १३ हजार ३४० शेतकऱ्यांचा समावेश झाला आहे. वाशीम जिल्ह्यातील सहाही तालुक्यांमधील ३५६ गावांतील एक हजार ८२३ शेतकरी या यादीत पात्र ठरले आहेत. त्यात रिसोड तालुक्यातील ५४०, कारंजा ३९४, वाशीम ३०९, मालेगाव २७१, मानोरा १९७ आणि मंगरूळपीर तालुक्यातील ११२ शेतकऱ्यांचा समावेश आहे. वाशीम जिल्ह्यात यापूर्वीच्या याद्यांमधील आधार प्रमाणीकरण पूर्ण केलेल्या ५० हजार ६४१ शेतकऱ्यांच्या कर्जखात्यांत ४४६ कोटी ९८ लाख रुपये जमा करण्यात आले आहेत.

अमरावती जिल्ह्यात योजनेच्या अंमलबजावणीदरम्यान याद्यांमधील त्रुटींचे प्रश्नही पुढे आले आहेत. सिंदी बुद्रुक गावातील शेतकऱ्यांची नावे कर्जमाफीच्या यादीत समाविष्ट झाली असली, तरी काहींची नावे दुसऱ्याच गावाच्या यादीत आल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे पात्र शेतकऱ्यांना स्वतःच्या नावाची आणि कर्जखात्याची खातरजमा करावी लागत आहे. असा सावळा गोंधळ बहुतांश खातेदारांच्या बाबतीत उडाल्याची माहिती आहे.‌

आत्महत्याग्रस्त यवतमाळ जिल्ह्यातही कर्जमाफी योजनेतील अंमलबजावणीची अनागोंदी चव्हाट्यावर आली आहे. यवतमाळ जिल्ह्यातील काळी दौलत खान येथील बाबूराव खंडागळे यांचे ४० हजार रुपयांचे पीककर्ज थकीत राहिल्याने व्याजासह ४८ हजार रुपयांवर पोहोचले. मात्र, त्यांना अद्याप कर्जमाफीचा लाभ मिळालेला नाही. बँक आणि सेवा सहकारी सोसायटीकडे पाठपुरावा करूनही स्पष्ट उत्तर मिळाले नसल्याचे त्यांचे म्हणणे आहे.

दुसरीकडे, वागद येथील मनीष जाधव यांचे एक लाख ४० हजार रुपयांचे कर्ज माफ झाले; मात्र त्यांना यंदाच्या खरीप हंगामात नवीन पीककर्ज मिळाले नाही. त्यामुळे खरीप हंगामाच्या सुरुवातीला असताना पैशाची जुळवाजुळव करण्यासाठी खाजगी सावकाराकडे धाव घ्यावी लागली.

वर्धा जिल्ह्यातही ई-केवायसी आणि तांत्रिक त्रुटींमुळे लाभ मिळण्यास विलंब होत आहे. योजनेसाठी अपलोड केलेल्या ७२ हजार ६७१ कर्जखात्यांपैकी ५९ हजार ८७१ शेतकरी पात्र ठरले. त्यापैकी ४० हजार १०१ शेतकऱ्यांची ई-केवायसी पूर्ण झाली असून, ३२ हजार ८९ शेतकऱ्यांचे कर्ज माफ झाले आहे.

‘डेटा नॉट फाउंड’सारख्या त्रुटींमुळेही शेतकरी अडचणीत आहेत. योजनेनुसार एक एप्रिल २०१९ ते ३१ मार्च २०२५ या कालावधीत घेतलेले, ३० सप्टेंबर २०२५ पर्यंत थकीत असलेले आणि ३१ मार्च २०२६ पर्यंत परतफेड न झालेले पात्र पीककर्ज तसेच पुनर्गठित कर्ज दोन लाख रुपयांपर्यंत माफ केले जात असल्याचा दावा प्रशासनाकडून केला जात असला तरी प्रत्यक्षात जमिनीवर चित्र मात्र वेगळेच असल्याचा आरोप शेतकरी करीत आहेत.

---विदर्भातील कर्जमाफीची स्थिती
चौथ्या यादीतील पात्र शेतकरी (विभागनिहाय)
विभाग-- शेतकरी संख्या
अमरावती विभाग--१३,३४०
नागपूर विभाग--४,६०२
विदर्भ एकूण --१७,९४२
-
नागपूर विभाग : आधार प्रमाणीकरणाची स्थिती
जिल्हा--यादीतील कर्जखाती--आधार प्रमाणीकरण पूर्ण--प्रमाणीकरण प्रलंबित
नागपूर--४७,४८२--३३,४२२--१४,०६०
वर्धा--६०,८३०--४५,२०२--१५,६२८
भंडारा--२७,६४५ --२४,१३९-- ३,५०६
गोंदिया--२७,९५०--२३,४२४--४,५२६
चंद्रपूर--५३,४७३--४२,९५३--१०,५२०
गडचिरोली--१३,८५४--८,९९६--४,८५८
एकूण--२,३१,२३४--१,७८,१३६--५३,०९८

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ज्ञानेश कुमार यांची खुर्ची जाणार, तुरुंगवारीही ठरलेली! रामलीला मैदानातून राहुल गांधींचा थेट इशारा...

RINKU SINGH: ठरलं तर मग! रिंकू सिंहच्या लग्नाची तारीख पक्की, बहीण नेहा सिंहने दिली मोठी अपडेट; शॉपिंगही झाली सुरू, जाणून घ्या सविस्तर

बांदेकरांच्या सुनेची झी मराठीच्या नव्या मालिकेत एन्ट्री! हर्षद अतकरी साकारणार 'अभ्या', तारीख आणि वेळ जाहीर

थंडीच्या दिवसांत ओठ फुटतात, कोरडे पडतात? पारिजातकाच्या फुलांपासून बनवा नॅचरल लिप बाम; ओठ राहतील मऊ!

Latest Marathi News Update : "भाजप कधीही पुन्हा सत्तेत येणार नाही!" अखिलेश यादव यांचा दावा; उत्तर प्रदेशातील मतचोरीवरून भाजपवर गंभीर आरोप

SCROLL FOR NEXT